YCMOU Admission  esakal
नाशिक

YCMOU Admission: मुक्‍त’च्‍या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी 31 पर्यंत मुदत; प्रवेश प्रक्रिया सुरु

अभ्यास केंद्रांच्या मान्‍यतेसाठी ३ ऑगस्‍टपर्यंत संधी

सकाळ वृत्तसेवा

YCMOU Admission : राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली असून, प्रवेश अर्ज भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. तर, ३ ऑगस्‍टपर्यंत प्रवेश अर्जास अभ्यास केंद्र मान्‍यता घेण्याची मुदत असेल. (YCMOU Admission Deadline for admission to free courses is 31 Admission process started nashik)

मुक्‍त विद्यापीठातर्फे यापूर्वी कृषी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरु होती. त्‍यापाठोपाठ १ जुलैपासून सर्व प्रकारच्‍या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

कृषी शिक्षणक्रम, शिक्षणशास्‍त्र शाखेतील काही अभ्यासक्रम (बी.एड. आणि बी.एड.-विशेष), व एमबीए (प्रथम वर्ष) या अभ्यासक्रमांव्‍यतिरिक्‍त अन्‍य सर्व अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी येत्‍या ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

..तर शिष्यवृत्ती नाही

शिष्यवृत्तीचा पर्याय स्‍वीकारुन प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना शिक्षणक्रम शुल्‍कात सवलत दिली जाते. मात्र, विद्यार्थ्यांनी आवश्‍यक कागदपत्रे अपलोड न केल्‍यास किंवा महाडीबीटी संकेतस्‍थळावर ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज सादर न केल्‍यास, शिष्यवृत्ती अर्जात त्रृटी राहिल्‍यास, शिष्यवृत्ती अर्ज विभागांनी अपात्र ठरविल्‍यास किंवा रद्द ठरविल्‍यास, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्‍कातील सवलत रद्द केली जाईल व त्यांना संपूर्ण शुल्‍क जमा करुन प्रवेश निश्‍चित करावा लागेल, असे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रवेश प्रक्रियेचे टप्पे असे-

* ऑनलाइन पद्धतीने http://ycmou.digitaluniversity.ac/ संकेतस्‍तळावर नोंदणी

* ‘ॲडमिशन’अंतर्गत माहितीपुस्‍तिका प्राप्त करुन सूचना वाचून घ्याव्‍यात

* अभ्यासक्रमनिहाय अभ्यासकेंद्रांची माहिती उपलब्‍ध असून, हव्‍या त्‍या अभ्यासकेंद्राची निवड करता येईल

* अभ्यासकेंद्राचा संकेतांक लिहून ठेवावा व अर्ज भरताना दाखल करावा

* प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी आवश्‍यक कागदपत्रांची स्‍कॅनकॉपी, स्‍वाक्षरी, विद्यार्थ्याचे छायाचित्र आदी सज्‍ज ठेवावे

* नव्‍याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल

* नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कायम नोंदणी क्रमांक (पीएनआर)द्वारे लॉगइन करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT