YCMOU
YCMOU esakal
नाशिक

भावी मुख्याध्यापकांची होणार अग्निपरीक्षा

प्रशांत बैरागी

नामपूर (नाशिक) : शालेय जीवनात शिक्षक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत असतात. परंतु नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) यंदा शिक्षकांची परीक्षा नव्हे तर अग्निपरीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा शिक्षकांना एकाच दिवशी दोन विषयांचे पेपर द्यावे लागणार आहेत. विद्यापीठाच्या निर्णयावर शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर असून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे परीक्षेचे गुणदान करावे, अशी मागणी होत आहे. (YCMOU School Management Diploma course examination time table declare nashik news)

शिकण्याची प्रचंड आवड असून ज्यांना वेळेअभावी महाविद्यालयात जाणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांना, शिक्षण क्षेत्रातील नोकरदार व्यक्तींना नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वरदान ठरले आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी, शिक्षक विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. शिक्षण क्षेत्रात, विशेषतः माध्यमिक विभागात मुख्याध्यापक होण्यासाठी शाळा व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम गरजेचा केल्याने गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अभ्यासकेंद्रांमध्ये डीएसएम अभ्यासक्रमासाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश होवू लागले आहेत.

दरवर्षी साधारणपणे मे महिन्यात जवळपास सर्वच अभ्यासक्रमांची लेखी परीक्षा अधिकृत केंद्रात घेतली जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेला सामोरे जावे लागले. त्यानंतर मार्च २०२२ पासून कोरोनाचे संपूर्ण निर्बंध उठविण्यात आल्याने मे महिन्यात शाळा व्यवस्थापन पदविकेची परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मे महिन्यात परीक्षा घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाला मात्र मुहूर्तच सापडला नाही.

त्यानंतर १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर २४ ते ३० जून या काळात परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन करून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे ऐन शाळेच्या वेळेत नव्या शैक्षणिक वर्षांत सुट्टी कशी मिळवायची, असा प्रश्न अनेक शिक्षकांना पडला. सदर विद्यापीठाच्या निर्णयावर कडाडून टीका झाल्याने विद्यापीठाने एक पाऊल मागे घेत २४ जूनपासून होणाऱ्या परीक्षा स्थगित केल्या. त्यानंतर परीक्षा कधी होणार, होणार किंवा नाही, अशा चर्चा सुरू असतानाच एकाच दिवशी दोन पेपर घेण्याचा अजब फतवा विद्यापीठ प्रशासनाने काढल्याने शिक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. येत्या रविवारपासून (ता.२६) शाळा व्यवस्थापन पदविका परीक्षेचा श्रीगणेशा होणार असून विद्यापीठाने नुकतेच परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळित झाल्याने शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिक्षण खंडित होऊ नये यासाठी आभासी शिक्षणाचा पर्याय स्वीकारला गेला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सुरवातीपासून दूरस्थ शिक्षणावर भर देत असताना या काळात मात्र प्रवेश प्रक्रियेसह साऱ्या प्रक्रिया खोळंबल्या. मुख्याध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या शालेय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या निकषानुसार सहा महिने शिक्षक म्हणून काम केल्यानंतर मुख्याध्यापक पदासाठी शालेय व्यवस्थापनाचा अनुभव असावा, यासाठी शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.

"यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा उन्हाळी सुट्टीतच होतात. तसेच अभ्यासवर्ग वर्ग शनिवारी आणि रविवारी होतात. यंदा विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. त्याचा नाहक त्रास शिक्षकांना सहन करावा लागत आहे. एकाच दिवशी दोन पेपर घेण्याचा निर्णयच मुळात चुकीचा आहे. विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने किंवा अंतर्गत मूल्यमापनावर आधारित गुणदान करावे."
- काकाजी भामरे, माध्यमिक शिक्षक, नाशिक

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक

- २६ जून : शैक्षणिक व्यवस्थापन ( सकाळी साडेनऊ ते १.१५ )
कार्यालयीन व्यवस्थापन ( दुपारी २.१५ ते ६ वाजेपर्यंत )
- ३ जुलै : शैक्षणिक व्यवस्थापन : नवा दृष्टिकोन ( २.१५ ते ६ )
- १७ जुलै : शालेय आर्थिक व्यवस्थापन ( ९.३० ते १.१५ )
शाळेची रचना व भौतिक सुविधा ( २.१५ ते ६ )
- २४ जुलै : विद्यार्थी सेवा/ कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास ( ९.३० ते १.१५ )
शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधांचे व्यवस्थापन ( २.१५ ते ६ )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT