yesgaon
yesgaon esakal
नाशिक

बळीराजाचा छंद! येसगावचा पूर्व-पश्चिम भाग झाला 'कोकणमय'

प्रभाकर बच्छाव

येसगाव (जि.नाशिक) : कोकणचे नाव काढल्यावर डोळ्यासमोर चित्र उभे राहते, ते नारळाची झाडे व पोफळीच्या वाड्यांचे. अशा कोकणाचे दृश्य शेतकऱ्यांच्या छंदामुळे मालेगाव तालुक्याच्या दक्षिणेकडील येसगाव परिसरात तयार होऊ लागले आहे. टुमदार बंगल्याच्या अवतीभोवती व शेताच्या बांधावर नारळाची भली मोठी वृक्ष नजरेस भरत आहेत. त्यामुळे परिसरातील सौंदर्य खुलले असून, हा भाग अधिकच मनमोहक दिसू लागला आहे. (Yesgaon-east-west-area-became-Konkan-marathi-news-jpd93)

चक्क कोकणातला निसर्ग अवतरल्याचा भास

गाव व परिसरातील शेतमळ्यांच्या व वाड्या-वस्त्यांच्या रस्त्याच्या कडेला नारळाचे वृक्ष डोलत आहेत. या भागात दोन दशकांपासून द्राक्षाचे पीक बहरत आहे. द्राक्षांमुळे सुबत्ता आली आहे. जवळपास ७० टक्के शेतकरी कुटुंबीय शेतमळ्यांमध्ये राहतात. त्यामुळे ठिकठिकाणी टुमदार बंगले वसले आहेत. या बंगल्यांची व निसर्गाची शोभा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागेतील एक ठिबक सिंचनाची नळी झाडांसाठी राखीव ठेवली आहे. त्यामुळे झाडांना नियमित पाणी मिळत आहे. खत, पाण्यामुळे झाडे जोरदार वाढत आहेत. दिवसेंदिवस बंगला व बागेभोवती नारळाची झाडे लावण्याचा छंद शेतकऱ्यांना जडला आहे. परिसरातील शेतकरी जणू नारळाच्या वृक्षाच्या प्रेमात पडले आहेत. परिणामी नारळाचे वृक्ष लावण्याची एक प्रकारे येथे स्पर्धाच निर्माण झाली आहे. एका शेतकऱ्याने किमान १५ ते २० झाडांपेक्षा अधिक झाडे आपल्या शेतात लावलेली दिसतात. नारळाची झाडे लावण्याचे लोण आता येथील पश्‍चिम, उत्तर भागात पसरले आहे. त्यामुळे नारळाच्या झाडांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नारळाच्या झाडांमुळे समुद्रकाठची शोभा गिरणाकाठाकडे आल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. काही भागात कोकणातला हा निसर्ग येथे अवतरल्याचा भास होतो. उन्हाळ्यात अशा झाडांखाली मन:शांती आणि प्रसन्नता मिळण्यास मदत होते. नारळाचे व्यापारी ऑर्डर घेऊन गेल्याप्रमाणे पावसाळ्यात रोपे आणून देतात. तसेच, गावात व नर्सरीत विक्रीसाठी आलेले नारळाची झाडे ही शेतकरी खरेदी करतात.

रोपांना मिळतो चांगला दर...

कसमादे पट्ट्यातील अनेक मळ्यातील घरांजवळ किमान दोन-तीन झाडे तरी लावलेली दिसून येतात. कोकणातला हा निसर्ग आपल्या जवळच उभा करण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. काही शेतकऱ्यांनी आंबे, द्राक्ष, डाळींब बागेच्या चोहोबाजूने ८० ते १०० पेक्षाही अधिक नारळाची झाडे लावलेली दिसतात. हिरवी कच्ची नारळ (शहाळे) चांगले पैसे देऊन जातात. नारळाच्या जातीवंत एका रोपाची किंमत २०० रुपयांपासून ५०० रुपयांपुढे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT