YIN Arts Festival 2022 esakal
नाशिक

YIN Arts Festival 2022 : ‘SAKAL’तर्फे उद्यापासून ‘यिन’ कला महोत्‍सव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : युवा ऊर्जा फाउंडेशन, अमोल दिनकर पाटील प्रस्‍तुत व इन असोसिएशन विथ अपजेट अलमिरा ग्रोमिंग नेटवर्क मार्केटिंगतर्फे आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या सहकार्याने आयोजित ‘यिन’ कला महोत्‍सवाला शुक्रवार (ता. ११)पासून येथे सुरवात होत आहे. या दोनदिवसीय महोत्‍सवात महाविद्यालयीन विद्यार्थी विविध स्‍पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्‍यातील कलागुणांचे दर्शन घडविण्यासाठी सज्‍ज झाले आहेत. (YIN Arts Festival 2022 from tomorrow by SAKAL Nashik News)

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात महोत्‍सवाला सकाळी अकराला सुरवात होईल. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील, अभिनेता चिन्‍मय उदगीरकर, मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ‘यिन’ व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार, क्रिएटर अपजेट मयंक दुडेजा, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. अशोक थोरात, अभिनेत्री गौरी किरण आदी उपस्‍थित राहतील.

उद्‌घाटनानंतर मविप्र संस्‍थेच्‍या विविध महाविद्यालयांतील सभागृहात कला स्‍पर्धा पार पडतील. आत्तापर्यंत नोंदणीला महाविद्यालयीन युवकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्‍यामुळे विविध कला स्‍पर्धांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे. दरम्‍यान, शनिवारी (ता. १२) होणाऱ्या समारोप कार्यक्रमास विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्‍त जयंत नाईकनवरे आदी उपस्‍थित राहतील.

महोत्सवात शुक्रवारी (ता. ११) होणाऱ्या स्पर्धा

कार्यक्रम वेळ स्‍थळ

उद्‌घाटन समारंभ सकाळी अकरा थोरात सभागृह

एकल व समूह नृत्‍य सकाळी साडेअकरा थोरात सभागृह

एकल गायन व रॅप दुपारी एक थोरात सभागृह

फॅशन शो दुपारी दोन थोरात सभागृह

एकपात्री अभिनय सकाळी साडेअकरा आयएमआरटी सभागृह

स्‍टॅन्डअप कॉमेडी व मिमिक्री दुपारी एक आयएमआरटी सभागृह

मूकअभिनय सकाळी साडेअकरा आयएमआरटी सभागृह

स्‍कीट दुपारी साडेबारा आयएमआरटी सभागृह

वक्‍तृत्‍व स्‍पर्धा सकाळी साडेअकरा एमएसडब्‍ल्‍यू सभागृह

वाद-विवाद स्‍पर्धा दुपारी एक एमएसडब्‍ल्‍यू सभागृह

काव्यवाचन स्‍पर्धा दुपारी दोन एमएसडब्‍ल्‍यू सभागृह

क्‍लेवर्क सकाळी साडेअकरा एमएसडब्‍ल्‍यू उद्यान परिसर

कोलाज वर्क सकाळी साडेअकरा एमएसडब्‍ल्‍यू उद्यान परिसर

व्यंग्यचित्र सकाळी साडेअकरा एमएसडब्‍ल्‍यू उद्यान परिसर

छायाचित्र सकाळी साडेअकरा एमएसडब्‍ल्‍यू उद्यान परिसर

"महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्‍या कलागुणांना वाव मिळाल्‍यास, त्‍यांच्‍यातून अनेक कलावंत घडतात. त्‍यामुळे ‘यिन’ कला महोत्‍सव हा कलावंत घडविणारा उत्‍सव ठरेल. विद्यार्थ्यांनी तयारीने स्‍पर्धेत सहभागी होऊन चांगली कामगिरी करावी."

- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

"शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. या कलांना व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्यासाठी ‘यिन’ कला महोत्‍सव मोलाची भूमिका बजावेल. सर्व सहभागींनी आपली सर्वोत्तम कामगिरी करावी. स्‍पर्धकांना माझ्याकडून शुभेच्‍छा."

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

"दोनदिवसीय ‘यिन’ कला महोत्‍सवाच्‍या नोंदणीला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकच्‍या सांस्‍कृतिक वैभवात भर घालणारी ही स्‍पर्धा असून, या स्‍पर्धेच्‍या माध्यमातून तरुणाईला करिअर घडविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळेल, असा मला विश्‍वास वाटतो."

- दिनकर पाटील, माजी सभागृहनेते, महापालिका

"विद्यार्थ्यांना योग्‍य मार्गदर्शन मिळाले, तर ते उत्तम कामगिरी करू शकतात. ‘यिन’ कला महोत्‍सवातील स्‍पर्धकांनी कसून तयारी करताना चांगली कामगिरी करावी. या व्‍यासपीठावरील कामगिरीने त्‍यांचे करिअर घडू शकते. त्‍यामुळे आत्‍मविश्‍वासाने स्‍पर्धेला समोरे जावे."

- मयंक दुडेजा, क्रिएटर, अपजेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT