Motivational Story esakal
नाशिक

Motivational Story : टांझानियामध्ये निफाडचा तरुण करतोय कांद्याची शेती

दीपक घायाळ

विंचूर (जि. नाशिक) : शेतकऱ्यांची मुले शेतीकडे वळत नाहीत, अशी परिस्थिती तयार झाली आहे. नेमक्या अशाच काळात शेळकेवाडी (ता. निफाड) येथील तरुण शेतकरी प्रवीण बाळासाहेब जगताप हे आफ्रिका खंडातील टांझानियामध्ये कांद्याची शेती करत आहेत. अहमदाबादचे व्यापारी नरेंद्र गुप्ता यांच्यासमवेत ४० एकर शेती भाड्याने घेतली आहे.

प्रवीणला शेतीची आवड. मात्र घरची शेती कमी असल्याने प्रवीण शेतीची इतर कामे करत असत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कांदा खरेदीसाठी श्री. गुप्ता येत होते. त्यांच्याशी प्रवीणचे दाजी वाल्मिक वाघ यांच्याशी परिचय झाला होता. (Young man from Niphad is doing onion farming in Tanzania 40 acre farm on lease with Ahmedabad traders Nashik News)

श्री. वाघ यांनी प्रवीणची श्री. गुप्ता यांच्याशी परिचय करून दिला. दोघे चांगले मित्र झाले. टांझानियामध्ये कांद्याचे उत्पादन कमी होत असून मागणी अधिक असल्याने श्री. गुप्ता यांनी टांझानियात जाऊन कांदा शेती करण्याची संकल्पना प्रवीण समोर ठेवली. प्रवीणने त्यात तत्काळ होकार दिला. मग भाड्याने शेती घेत लाल कांद्याची लागवड करण्यात आली. एक महिन्यापासून प्रवीणच्या मार्गदर्शनाखाली टांझानियामध्ये कांद्याची शेती सुरु आहे.

शेतीची कामे स्थानिक मजुरांकडून करुन घेतली जात आहे. सुरवातीला प्रवीणला भाषेची अडचण आली. थोडे दिवस गाइडचे त्यासाठी सहकार्य घेण्यात आले. स्वाहिली भाषा पुढे प्रवीण शिकला. त्यानंतर खाणाखुणाद्वारे कामे करुन घेण्यास सुरवात झाली. आता गाइडची प्रवीणला फारशी गरज भासत नाही. प्रवीणचा प्रवास, निवास, आरोग्यविषयक खर्च श्री. गुप्ता हे असून महिन्याला चाळीस हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे.

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

प्रवीणचे स्थानिकांमध्ये कौतुक

शेतकरी मुलगा म्हटल्यावर त्याला लग्नासाठी मुलगी द्यायला अनेकजण धजावत नाही. तसेच शेतकरी मुलाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. मात्र शेतकऱ्यांची मुले कमी नसतात हे प्रवीणने दाखवून दिले आहे. प्रवीणने दुसऱ्या देशात जाऊन कांद्याची शेती करणे हे गौरवास्पद बाब असल्याचे विंचूत ज्ञानेश्‍वर भडांगे यांनी म्हटले आहे. याशिवाय प्रवीणच्या शेतीविषयक वेगळ्या प्रयत्नांबद्दल स्थानिकांमधून कौतुक होत आहे.

"टांझानियामध्ये मुख्य पीक मका आहे. टांझानियात कांदा पीक खूप कमी घेतले जाते. मात्र कांद्याची मागणी अधिक आहे. कांदा पाठवण्यासाठी खर्च अधिक येतो म्हणून टांझानियात कांदा पिकाची लागवड करण्याचे ठरवले."

- प्रवीण जगताप (तरुण शेतकरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT