attack esakal
नाशिक

Nashik Crime News : वणीत तरुणावर धारधार शस्त्राने वार

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : हॉटेलमध्ये खुर्चीचा धक्का लागल्याच्या कारणातून चार जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केल्याची घटना वणीत सोमवारी (ता.१२) रात्री घडली. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा जणांना अटक केली तर एक जण पळून गेला. (young man stabbed with sharp weapon at wani Nashik Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

वणी महाविद्यालयाजवळील चौफुलीवर राजूभाई चायनीज या ठिकाणी प्रकाश गांगोडे (वय २४ रा. विश्रामबाग पाडा) हा चायनीज खाण्यासाठी बसलेला असताना एका युवकाचा धक्का प्रकाश यास लागला. यावेळी प्रकाश याने मला धक्का का दिला ? याची विचारणा सदर युवकास केली असता, याचा राग आल्याने सदर संशयित व त्यासोबत असलेल्या अन्य तीन जणांनी मिळून प्रकाश यास बेदम मारहाण केली.

यातील एकाने दगड प्रकाशच्या डोक्यात टाकला तर उर्वरित दोघांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वर करत जखमी केले. यावेळी प्रकाश यास जयेश पालवी व प्रवीण जाधव हे सोडविण्यासाठी आले असता. सदर संशयित यांनी प्रवीण जाधव याच्या गळ्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. यात ते किरकोळ जखमी झाले. दरम्यान संशयित यांनी प्रकाश याचे वडील यांना पोलिसात तक्रार केली तर मारुन टाकून असा दमही दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : पंतप्रधान आणि सभापतींच्या एआय द्वारे तयार केलेल्या व्हिडिओबद्दल ९ काँग्रेस नेत्यांना नोटीस

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT