Nashik esakal
नाशिक

Nashik News : तरुण सरपंचाची आगळीवेगळी उतराई! स्वखर्चाने गावाला दिले शुद्ध पाणी

सकाळ वृत्तसेवा

येवला : वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षीच गावाने प्रचंड बहुमताने थेट सरपंचपदी निवडून दिले. गावाच्या या प्रेमाची उतराई करण्यासाठी दिलेला शब्द पाळत चांदगावचे तरुण सरपंच प्रणव साळवे यांनी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चून गावाला शुद्ध पाणी देण्यासाठी आरओ प्लॉंट दिला आहे. या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

चांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कांतिलाल साळवे व इतर स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता याठिकाणी आली. सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रणव साळवे या अवघ्या एकवीस वर्षाच्या तरुणाने बाजी मारली. साळवे घराण्याला राजकीय वारसा असून या गावात स्वर्गीय बाजीराव नाना साळवे, बबन साळवे, कांतिलाल साळवे यांनी सरपंचपद भूषविले.

आता प्रणव या गावाचे प्रथम नागरिक म्हणून नेतृत्व करणार आहे. या कुटुंबाने पंचायत समितीचे पाच वेळेस सभापतिपदही भूषविले आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर्श घेत गावाच्या विकासासाठी प्रणवने सरपंच होऊन गावाचा विकास करायचा हा विडा उचलला आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत गावाला त्याने जे शब्द दिले आहेत, त्या शब्दांची पूर्ती करायची ही मनाशी खूणगाठ बांधली आहे.

आजोबा स्वर्गीय बाजीरावनाना व साखरचंद साळवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सरपंचपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात स्वखर्चातून साडे तीन लाख रुपयांचे शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरओ गावाला भेट दिली आहे.

शब्दपूर्तीच्या पहिल्या कामाचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या साक्षीने सरपंच प्रणव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसाला ५ हजार लिटर क्षमता या आरओची आहे. स्वर्गीय प्रवीण (गंगाराम) बाजीराव साळवे यांच्या स्मरणार्थ हे आरओ गावाला सरपंच साळवे यांनी दिले आहे. महिनाभरात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

१० रुपयात २० लिटर पाणी

गावातील सुमारे २५० कुटुंबांना या शुद्ध पाण्याचा आरोग्यासाठी फायदा होणार असल्याने ग्रामस्थही आनंदात आहे. तरुण सरपंच झाल्याने गावाचा विकासाच्या अपेक्षाही प्रणवकडून ग्रामस्थांच्या वाढल्या आहेत. १ रुपयात २ लिटर तर १० रुपयात २० लिटर पाणी मिळणार असून गावातील सार्वजनिक उत्सव, विवाह व इतर विधी यासाठी मोफत पाणी सेवा देण्यात येणार असल्याचे सरपंच साळवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागांत पाणी साचले

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT