Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून युवतीला 9 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : ऑनलाईन जॉब, पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून सातत्याने फसवणूक होत असताना, त्याबाबत सायबर पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जाते. फसवणुकीच्या बातम्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होतात.

तरीही उच्चशिक्षित तरुणाई सायबर भामट्यांच्या विळख्यात सापडून फसगत करून घेतात. देवळाली कॅम्प परिसरातील युवतीला ऑनलाईन टास्कच्या माध्यमातून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने तब्बल ९ लाख २८ हजारांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात सायबर कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा तपासासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. (Young woman extorted 9 lakhs by luring her with an online task Nashik Cyber ​​Crime)

दिव्या इंद्रजित पपनेजा (रा. म्हाडा कॉलनी, वनराई, गोरेगाव, मुंबई. मूळ रा. देवळाली कॅम्प, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना ९४६३२३९८४६ या क्रमांकावरून संशयित सायबर भामट्याने संपर्क साधून त्यांना टेलीग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन प्रिपेड टास्कच्या नावाखाली चांगली आर्थिक कमाई करण्याचे आमिष दाखविले.

या आमिषाला भूुलून वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊनही त्यांना मोबदला मिळाला नाही. त्या मोबदल्यासाठी संशयितांनी त्यांना अनेक प्रक्रियेच्या नावाखाली पैसे ऑनलाईन भरण्यास लावत तब्बल ९ लाख २८ हजार ५२० रुपयांना गंडा घातला.

सदरचा प्रकार गेल्या २ ते ३ नोव्हेंबर या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याने युवतीने देवळाली कॅम्प पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तो तपासकामी सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Kolhapur : मिशन जिल्हापरिषद! कार्यकर्ता नाही वारदार महत्वाचा, कोल्हापुरात नेत्यांकडून मुलगा, सून, पुतण्या, रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

Virat Kohli: भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विराट कोहलीचे उत्तर, बरंच काही बोलून गेला! पाहा शास्त्री-गिलख्रिस्टने घेतलेली मुलाखत Video

Maharashtra Politics: ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा चर्चा! भाजपने शिंदे सेनेला डिवचले, महायुतीमध्ये संघर्ष वाढला

Latest Marathi News Live Update : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

SCROLL FOR NEXT