lemon juice
lemon juice esakal
नाशिक

शिकंजी व्यवसायात यशोधनची अनोखी भरारी; समाजापुढे ठेवला आदर्श

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ (जि. नाशिक) : वाढत्या उन्हाने जीवाची लाहीलाही होत असताना राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबू सिंकजी सरबतच्या गाड्या येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत सरबत घेऊन पुढे मार्गक्रम होत आहे. कोरोना संकटानंतर शाश्‍वत मार्ग शोधण्यात काही धडपडी तरुण यशस्वी होत आहे. नव्याने व्यवसायात दाखल झालेले औंदाणे (ता. सटाणा) येथील सुशिक्षित बेरोजगार असलेला यशोधन काकाजी निकम या तरुणाने अत्यंत अल्प वेळात भरारी घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

पहाटे पाचपासून कामाला सुरुवात

शोधनचे शिक्षण बारावी उत्तीर्ण असून, नाशिकमध्ये नामांकीत कंपन्यांमध्ये काम करून निराशाच पदरी पडत होती. घरभाडे, किराणा वजा जाता काही मिळत नसे. यातून कर्जबाजारी होण्यापेक्षा गावी जाऊन मिळेल तो व्यवसाय निवडून यशस्वी होण्याची मनात खुणगाठ बांधली. महामार्गावर एक छोटीशी गाडी बनवून ऐन उन्हाळ्यात सिंकजी सरबत व्यवसाय सुरू करून कुटुंबाला उभारी दिली. वाढत्या उन्हामुळे हा व्यवसाय तेजीत आहे. यशोधन काही कामानिमित्त गुजरातला गेल्यानंतर त्या भागात सिंकजी सरबतला मोठी मागणी असल्याचे लक्षात आले. त्यानुसार आपणही हा व्यवसाय करु शकतो, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सरबत ठेवण्यासाठी लागणारा गाडा गुजरातमध्ये पस्तीस हजारात लोखंडी ड्रमसह मिळतो. परंतु, त्याने अनेक युक्त्या वापरून पंधरा हजारांच्या आसपास गाडा तयार करून व्यवसायात गती मिळवली. दररोज १२५ ते १५० ग्लास सरबत विक्री करतो.

पहाटे पाचला सटाणा येथून बर्फ आणल्यानंतर दिवसभराच्या कामाला सुरवात होते. उन्हाळा ऋतूनंतर गावात जनरल स्टोअर्स चालवितो. या कामी पत्नी उज्वलाचे अनमोल सहकार्य मिळत असते. धडपड करणाऱ्या या तरूणाचा आदर्श घेण्यासारखा आहे.

काय आहे सिंकजी सरबत

स्वच्छ फिल्टर पाणी, ड्रमभोवती बर्फाचे आच्छादन, ग्लासभर थंड पाण्यात साखरेचे पाणी, सब्जा (राणतुळसचे बी), चवीइतके काळे मीठ मिक्स करून सरबत तयार होते. उन्हाळ्यात पोटाच्या विकारांवर हे सरबत फायदेशीर ठरते.

''नोकरीची शाश्‍वती नसल्याने आपण व्यवसाय निवडावा, या हेतूने सरबत व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. आपल्या भागात परराज्यातील नागरिक आनंदाने व्यवसाय करु शकतात आपण का नाही, या उद्देशाने हा व्यवसाय सुरू केला.'' - यशोधन निकम, औंदाणे, ता. सटाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT