younger brother killed elder brother nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : शिवीगाळ करण्याच्या शुल्लक कारणावरून सख्या भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिडको परिसरातील कामाठवाडे येथे शुक्रवारी रात्री दोघ भावांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकिंनंतर भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (younger brother killed elder brother nashik crime news)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार न्यू गोपाल चौक, कामाठवाडे येथे राहणारे मयत सदाशिव दामू निकम (वय ५५ ) व संशयित हरि दामू निकम (वय ५०)यांच्यात रात्री नऊ वाजेच्या सुमारास तू मला शिवीगाळ का करतो या शुल्लक कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले.

यामध्ये संशयित हरी दामू निकम याने सख्या मोठ्या भावाच्या म्हणजेच सदाशिव दामू निकम डोक्यात लाकडी दांडुका मारून त्यांना मारहाण केली. यावेळी अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सूरू असतांना सदाशिव निकम यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बायडी कैलास सुर्यवंशी यांनी अंबड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हरि दामू निकम याच्यावर भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत. मयत सदाशिव निकम याच्या पश्यात तीन मुले व दोन मुली परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT