Crime.jpg 
नाशिक

सख्खा भाऊच निघाला वैरी! जमिनीच्या लालसेपोटी मोठ्या भावालाच संपविले; परिसरात खळबळ

गोपाळ शिंदे

नाशिक/घोटी : वासाळी (ता. इगतपुरी) प्रॉपर्टीसाठी सख्खी रक्ताचीच नाती एकमेकांचा जीवावर उठली असल्याच्या घटना वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 10) सायंकाळी घडली. जमिनीच्या वादामुळे सततचीच होती कुरकूर. 'जर जमीन देणार नसेल तर तुझा मुडदा पाडतो, तुला जिवंत सोडणार नाही'. अन् नंतर घडले असे...वाचा सविस्तर

अशी आहे घटना

गुरुवारी (ता. 10) सायंकाळी दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हिरामण लक्ष्मण खादे (वय 40) व लहान भाऊ लालू लक्ष्मण खादे (वय 36) यांच्यात जमिनीच्या हिस्स्यावरून सतत कुरकूर होत होती. दरम्यान लालू याने 'जर जमीन देणार नसेल तर तुझा मुडदा पाडतो, तुला जिवंत सोडणार नाही' असे ठणकावले होते. यावरून दोघांत झालेल्या भांडणाची आग संशयित आरोपी लालू याच्या डोक्यात खुपत राहिली. त्याने सायंकाळी रागाच्या भरात आपल्या घरातील धारदार कोयत्याने हिरामण याच्या डोक्यात वार करत गंभीर जखमी केले. दरम्यान हिरामण यांची पत्नी लिलाबाई हिने आरडाओरडा करत शेजारी असलेल्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले नागरिक आल्याचे पाहून संशयित आरोपी फरार झाला. जखमी हिरामण खादे यांस तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने शुक्रवारी साडेबारा वाजता हिरामण यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. 

संशयित आरोपीस अटक

घोटी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे उपनिरीक्षक संजय वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवलदार शितलकुमार गायकवाड, गोपनीय गणेश सोनवणे, प्रकाश कासार, राहुल साळवे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपीस पोलीस आल्याची माहिती मिळताच पळून जाण्याच्या तयारीत असतांना पथकाने चालाखीने संशयित आरोपी लालू खादे यास झडप घालत अटक केली. वरिष्ठ पातळीवर गंभीर घटनेची दखल घेत नाशिक ग्रामीण विभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी भेट देत पोलिसांना मार्गदर्शक सूचना केल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे हे करत आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT