Entering the house out of fear, the youth and the gangs that came in search of him.  esakal
नाशिक

Nashik Crime : सिडकोमध्ये टोळक्याकडून तरुणाचा पाठलाग; दहशत माजविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : महाकाली चौकात दांडिया मैदानात झालेल्या वादात तरुणाचा पाठलाग करून दशहत माजविल्याचा प्रकार शनिवारी (ता. १) रात्री बाराच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे समोर आल्याने अंबड पोलिस ठाण्याचा वचक पुन्हा चर्चेत आला आहे. (Youth chased by mob in CIDCO nashik Latest Crime News)

अंबड हद्दीत गुन्हेगारीचा आलेख वाढताच असून, अवैध व्यवसाय, मारहाण टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत असूनही पोलिस ॲक्शन मोडमध्ये का येत नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. महाकाली चौकत दांडियात झालेल्या भांडणात युवकास मारहाण करण्यासाठी २५ ते ३० युवक त्याचा पाठलाग करीत होते.

युवकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक घरात आश्रय घेतला. त्यानंतर येथीलच राहणाऱ्यांनी गुंडाना येथून निघून जा, असे सांगितल्यानंतर तो युवक सापडत नसल्याचे बघून ते माघारी फिरले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मात्र, तो युवक या २५ ते ३० जणांच्या घोळक्याच्या हाती लागला असता तर मात्र नक्कीच अनुचित प्रकार घडला असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT