satish t.png 
नाशिक

ह्रदयद्रावक! एका रात्रीत सतीशच्या निर्णयाने सोन्याचा संसार उध्वस्त; आठवणी सोडून सारं काही संपल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / नगरसूल : २५ वर्षांचा सतीश त्याची पत्नी व दीड वर्षाचा लहान मुलगा असे सुखी कुटुंब होते. पण कोण जाणे त्यांच्या संसाराला कोणाची नजर लागली आणि सारं काही उध्वस्त झाले. सतीशने एका रात्रीत घेतलेल्या त्या निर्णयाने सर्वच संपलं होतं. काय घडले वाचा..

त्या निर्णयाने सर्वच संपलं होतं

नगरसूल येथील आदिवासी चौफुली वस्तीवरील सतीश संजय ठाकरे (२५), त्याची पत्नी व दीड वर्षाचा लहान मुलगा शनिवारी रात्री घरात झोपले होते. मात्र पहाटे सतीशच्या पत्नीला जाग आली तेव्हा सतीशने घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने आरडाओरड करून आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांना माहिती दिली. रहिवाशांनी तत्काळ दोरी काढून सतीशला रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नगरसूल पोलिसांनी घटनेची नोंद केली.

परिसरात शोककळा

या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ६) सकाळी उघडकीस आली. या घटनेने कुटुंबीय व गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT