Accidental Vehicles esakal
नाशिक

Nashik : सिन्नर येथील सायकल स्वार तरुणांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे गावाजवळ आज सकाळी सात वाजेच्या सुमारास सायकल वरून शिर्डीकडे जाणाऱ्या सिन्नर येथील पाच सायकल स्वारांना पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा एसयूव्ही या भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात सिन्नर येथील दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला असून आणखी एक जणाची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर दोघे सायकलस्वार देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. (youth cyclists going for shirdi died in accident at Sinnar Nashik Latest Marathi News)

आदित्य महेंद्र मिठे व कृष्णा संतोष गोळेसर अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यासह सिन्नर शहरातील लोंढे गल्ली भागात राहणारे पाच तरुण आज दि 11 पहाटे सायकल वरून शिर्डी कडे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास पाथरे गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा एसयुव्ही क्रमांक MH48/AK6286 ही जीप थेट या सायकल स्वारांच्या घोळक्यात शीरली.

त्यांना चिरडत जीपने पुढे ओढत नेले. ही जीप देखील रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत पलटी झाली. अपघाताची माहिती समजल्यावर पाथरे गावातील तरुणांनी तसेच वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. वावी, पाथरे, पांगरी येथील रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जखमी झालेल्या सर्वांना सिन्नर येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघात करणाऱ्या महिंद्रा वाहनातील तीन प्रवाशांना देखील उपचारासाठी मुंबईकडे हलवण्यात आल्याची माहिती मिळते. सदर वाहन महिला चालवत होती असे मदतीला धावलेल्या प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT