kalpesh girna 2.png 
नाशिक

क्रूर नियती..अक्षयतृतीयेलाच गावात पसरला भयंकर सन्नाटा...अन् अचानक आक्रोश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / देवळा : ऐन अक्षयतृतीया सणाच्या दिवशीच देवळा गावात एक मनाला चटका लावून घटना घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच संचारबंदी आहे. अशातच ज्या सणाच्या दिवशी अख्ख्या गावात गोडाधोडाचे केले जाते. अश्या या गावात सर्वांना चुली बंद कराव्या लागल्या..कारण गावात ऐन अक्षयतृतीयेच्या दिवशीच धक्कादायक घटना घडली.. ज्यामुळे गावात शोककळा पसरली. 

अशी घडली घटना...

वसाका साखर कारखान्याच्या बाजूला असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी (ता.25) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. कल्पेश देशमुख (वय 19) असे मृताचे नाव आहे. लोहोणेर (ता. देवळा) येथील मृत कल्पेश शनिवारी दुपारी मित्रांसमवेत गिरणा नदीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना कल्पेश यास नदीपात्रातील खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. या वेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत काहींनी नदीपात्रत उडी मारत कल्पेशला बाहेर काढत उपचारासाठी देवळा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. कल्पेश याने बारावीची परीक्षा दिली होती. अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला कल्पेशच्या मृत्यूमुळे लोहोणेर गावावर शोककळा पसरली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकार! कपडे बदलताना महिलेचे CCTV त चित्रीकरण; दुकान मालक अटकेत

आशिष नेहराची लाईव्ह सामन्यात शुभमन गिलला शिवी; DC vs GT सामन्यात बरेच काही घडले Video Viral

Stock Market Today:युद्ध थांबलं तरी शेअर बाजार घसरला! काय आहे कारण? TCS चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : नागपूरमधील गॅस गोदामात चुकीच्या संदेशामुळे ग्राहकांचा संताप

SCROLL FOR NEXT