Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : ऍसिड हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : ३१ मेस अंबड औद्योगिक वसाहतीत एका खासगी फायनान्स कंपनीच्या थकीत कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी गेलेल्या वसुली कर्मचाऱ्यांसह त्याच्या मोठ्या भावावर थकबाकीदाराने ऍसिड फेकून हल्ला केल्याचा प्रकार घडला होता.

या ऍसिड हल्ल्यात खासगी वसुली कर्मचारी गणेश फाफळे (३१, विडी कामगारनगर) यांच्यासह त्यांचे मोठे बंधू किरण फाफळे (४० रा. गणेश चौक सिडको) हेदेखील जखमी झाले होते. (Youth injured in acid attack dies nashik crime news)

त्यांना त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर किरण फाफळे यांच्यावर नाशिक शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांनी किरण फापाळे यांनी रुग्णालयातून घरी येण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल झाले.

त्यांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी पूर्ण बरं वाटत नसतानाही दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी किरण फाफळे (ता. २४) यांना अचानक पोटात दुखू लागले व चक्कर येऊ लागल्याने त्यांना पुन्हा एकदा पुढील उपचारासाठी लेखानगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेत असताना रुग्णालयात पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी मयत किरण फाफळे यांच्या नातेवाइकांनी ऍसिड हल्ला करणाऱ्या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तरीही सध्या अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे चुंचाळे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मयत किरण फापळे यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT