Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : कांदा व्यापाऱ्याच्या शेडमध्ये तरुणाचा खून; संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : नामपूर- सटाणा रस्त्यालगत असणाऱ्या कांदा व्यापाऱ्याच्या शेडमध्ये क्षुल्लक कारणावरून वायरने गळा आवळून एका तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Youth killed in onion traders shed Suspect in custody Nashik Latest Crime News)

नामपूर बाजार समितीचे संचालक, बालाजी ट्रेडिंगचे संचालक प्रतिष्ठित कांदा व्यापारी सचिन मुथा यांच्या कांदा शेडमध्ये कांदा निर्यातीच्या कामासाठी काही परप्रांतीय तरुण कामाला होते. त्यातील मुकादम आणि आणि दोन कामगार यांच्यात दोन हजार रुपयांचा वाद असल्याचे बोलले जात आहे.

त्यातूनच बुधवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास दोन कामगारांनी मुकादम शिवानंद कामत (वय ४१) यांच्याशी हाणामारी करून इलेक्ट्रीक वायरच्या सहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केला. गुरुवारी (ता. ६) सकाळी खून प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर कांदा व्यापारी सचिन मुथा यांनी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन विकासकुमार, अनिलकुमार या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT