MALEGAON POLICE.png 
नाशिक

BREAKING : VIDEO : मालेगावी पोलिसांना धक्काबुक्की..तरुणांनी सीसीटिव्हीत पाहून केली दगडफेक..धक्कादायक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्ण व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने मालेगाव शहरासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशातच धक्कादायक घटना घडली आहे.

असा घडला प्रकार
शहरातील अय्युबी चौकात गुरूवारी (ता.23) सकाळी दुध खरेदीसाठी निघालेल्या तरूणाला पोलिसांनी हटकले. तरूणाने अरेरावी केल्याने पोलिसाने लाठीचा प्रसाद दिला. यात या तरूणाच्या हाताला जबर मार लागल्याने संतप्त जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत पिटाळले. काही तरूणांनी चौकातील सीसीटिव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिस व राज्य राखीव दलाने हा जमाव पिटाळून लावला. येथील अय्युबी चौक व अल्लामा एकबाल पुल भागात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. 

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर..सातत्याने वाद 

याबाबत समजलेली माहिती अशी, संचारबंदी व लॉकडाऊन काळात सकाळी सात ते अकरा यावेळेत जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी काही प्रमाणात सुट दिली जाते. यावेळी कुटुंबातील एकाने बाहेर पडून किराणा, अत्यावश्यक वस्तु खरेदी कराव्यात अशी अपेक्षा असते. मात्र मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात. त्यातून सातत्याने वाद होत आहे. संबधित तरूणाला पोलिसांनी हटकले. तो दुध घेण्यासाठी जात असल्याचे समजते. पोलिसांनी त्याला लाठीने  मारहाण केली. त्यात मुलगा जखमी झाल्याने वादाला फुटले तोंड. जमावाने तोडफोड व टाकाऊ वस्तुंची फेकाफेक सुरू केली. जमाव नजीकच्या अल्लामा एकबाल पुलाकडे गेला. तेथील बँरिकेटींग काढली. चौकातील सीसीटिव्ही कॅमेरे त्यावर दगडफेक केली. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुन्हा फज्जा उडाला. जमाव वाढल्याने पोलिस माघारी फिरले. काही क्षणात वरिष्ट अधिकारी, अतिरिक्त कुमक व राज्य राखीव दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच जमाव पांगला. यानंतर वरिष्ट पोलिस अधिकारींनी जमावाची समजुत काढली.
हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SP Action Against Police Officer : तक्रार दाखल करण्याची भिती घालून पैसे मागणाऱ्या पोलिसावर एसपींची थेट कारवाई, कोल्हापुरातील घटना

Pregnant Woman: महामार्गावरील कोंडीत मातीच्या ढिगाऱ्यावरच प्रसूती; येवल्यातील सावरगावजवळील घटना; वेदनेचा डोंगर अन् मदतीचा हात!

IND vs PAK: आज एक नाही, तर भारत-पाकिस्तानचे दोन T20 सामने; कधी आणि कुठे पाहाणार? जाणून घ्या

Bengaluru Car Accident : बंगळुरुत आणखी एक भीषण अपघात ! भरधाव कार दुभाजक ओलांडून बसला धडकली, पाच जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; ४९० तक्रारदारांना २ कोटी ९० लाखांहून अधिकचा जप्त मुद्देमाल परत

SCROLL FOR NEXT