Nashik Crime News
Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : लंडनमध्ये नोकरीचे अमीष दाखवून तरुणांची फसवणूक; तिघांना 7 वर्षे सक्त मजुरी

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : लंडनमधील हॉटेलमध्ये ऑफीस स्टाफ व इतर पदावर नोकरी लावून देण्याचे अमीष दाखवून सुशिक्षित बेरोजगार असलेल्या नऊ तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघा संशयितांविरुध्दचा गुन्हा सिध्द झाल्याने त्यांना सात वर्षे सक्त मजुरी, २७ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी शुक्रवारी (ता.३) हा निकाल दिला. (Youth scammed by lure of job in London Forced labor for three years for 7 years Nashik Fraud Crime)

या खटल्याची माहिती अशी : तहसिना अब्दुल मुत्तलीब (रा. सुफियान चौक, बजरंगवाडी, मालेगाव), अनिता सदानंद सालीयान (रा. वर्सोवा, अंधेरी, मुंबई) व शेख मोहम्मद समीर फकीर अहमद उर्फ हनिसींग (रा. मेमन मशिदजवळ, कल्याण, ठाणे) या तिघा संशयितांनी संगनमताने शहर व परिसरातील नऊ तरुणांना लंडन शहरातील हॉटेल इंडिगो मध्ये ऑफीस स्टाफ व इतर पदावर नोकरी लावून देण्याचे अमीष दाखवून मेडिकल तपासणी, एमीग्रेशन, लेबर ऑफीसचे काम व विमान तिकिटासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करुन नऊ सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून २६ लाख ४० हजार रुपये घेतले.

बनावट कागदपत्र, नोकरी करारनामे, मेडिकल कागदपत्र, व्हिसा व हॉटेल इंडिगोचे व्हॅकन्सी पत्र असे बनावट दस्ताऐवज तयार करुन ते खरे असल्याचे भासवित आरीफ अहमद अल्ताफ अहमद (रा. नयापुरा, मालेगाव) याच्यासह त्याच्या मित्रांची नोकरीस न लावता, विदेशात नोकरीसाठी न पाठविता फसवणूक केली.

१५ नोव्हेंबर २०१५ ते २५ ऑगस्ट २०१६ दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला. या प्रकरणी आरिफ अहमदच्या तक्रारीवरुन आझादनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. जी. टकले, उपनिरीक्षक बी. जी. मोहिते यांनी या गुन्ह्याचा तपास करुन खटला न्यायालयात पाठविला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

न्यायाधीश बहाळकर यांच्या समोर या खटल्याचे कामकाज नुकतेच झाले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अशोक पगारे यांनी बाजू मांडली. या खटल्यात श्री. पगारे यांनी १८ साक्षीदार तपासले.

चौकशीत मुळ कागदपत्र उपलब्ध झाले नाहीत. सर्व दस्ताऐवज बनावट असल्याचे सिध्द झाले. गुन्हा सिध्द झाल्याने फसवणुकीच्या आरोपावरुन तिघा संशयितांना सात वर्षे सक्त मजुरी व तीनही संशयितांना एकत्रित २७ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

यातील तहसीना व अनिताला प्रत्येकी ११ लाख रुपये तर मोहम्मद समीरला ५ लाख रुपये दंड करण्यात आला. दंड न भरल्यास दोघा महिलांना एक वर्षे तर समीरला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. श्री. पगारे यांना या खटल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश बोरसे, पोलिस शिपाई विजय साेनवणे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT