collector office 1.jpg
collector office 1.jpg 
नाशिक

धक्कादायक! उपजिल्हाधिकारी दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतले; जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात एका युवकाने चर्चा करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोलसदृश्य ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ पाहायला मिळाली

आत्महत्येचा प्रयत्न भोवला! जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ

संशयित पंकज जानकीदास बैरागी (वय ३२) या युवकाने पी.एफच्या रकमेबाबत चर्चा करत असताना स्वत:जवळील प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोलसारखे ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यास थांबविले. दरम्यान, या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच धावपळ उडाली. येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले.

गुन्हा दाखल

यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरुध्द गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे.यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरुध्द गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT