crime2.jpg 
नाशिक

भररस्त्यात थरार! मदतीला धावून गेलेल्या तरुणाला मित्रानेच केले रक्तबंबाळ; अंगावर काटा आणणारी घटना

अंबादास शिंदे

नाशिक : (नाशिक रोड) 'माझ्या गाडीचे पेट्रोल संपले आहे, तू पटकन पेट्रोल घेऊन ये' समोरुन मित्राने फोन केल्याने आदित्य लगेच निघाला. बोलविल्या ठिकाणी पोहचल्यावर काही बोलायच्या अन् विचारायच्या आतच...अंगावर काटा आणणारी घटना 

अशी आहे घटना

आदित्य हेमंत देवरे (रा. देवळालीगाव) घरी टीव्ही बघत असताना त्याला सायंकाळी साडेसातच्या सुमारास किरण असतोर याने फोनवर सांगितले, की माझ्या गाडीचे पेट्रोल संपले आहे, तू तातडीने पेट्रोल घेऊन ये. परंतु आदित्यने सांगितले, की मी मित्राला पाठवतो. परंतु किरण म्हणाला, की तूच ये. त्यामुळे आदित्य दत्तमंदिर रोडवर असलेल्या सुराणा हॉस्पिटलजवळ येताच त्याला टोनू म्हस्के, किरण असतोर, किरण कसबे व त्यांच्या आणखी एका साथीदाराने चारी बाजूंनी घेरले व काही विचारण्याच्या आतच कोयता व तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. 

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जखमी आदित्य देवरेच्या नातेवाईक सीताबाई देवरे यांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने नातेवाइकासोबत घटनास्थळी येऊन रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झालेल्या आदित्यला रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सीताबाई देवरे यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात टोनू म्हस्के, किरण असतोर, किरण कसबे व त्याच्या साथीदाराविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी किरण असतोर, किरण कसबे यांना ताब्यात घेतले. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT