ZP Nashik  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. 14 कनिष्ठ सहाय्यकांना पदोन्नती

शासन निर्णय १ ऑगस्ट २०१९ नुसार ४ डिसेंबर २०२३ ला विभागीय पदोन्नती समितीची बैठक मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : शासनाचे पदोन्नतीचे धोरण व निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील १४ कनिष्ठ सहाय्यक यांना शुक्रवारी (ता. २२) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली.

शासन निर्णय १ ऑगस्ट २०१९ नुसार ४ डिसेंबर २०२३ ला विभागीय पदोन्नती समितीची बैठक मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (zilha parishad Promotion of 14 Junior Assistant nashik news)

या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते उपस्थित होते.

मुख्यालय व सर्व पंचायत समिती मिळून एकूण २४ पदांकरिता ४० प्रस्ताव मागविण्यात येऊन पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ३१ ऑगस्ट २०२३ ला रिक्त असलेल्या १३ व ऑक्टोबर महिन्यात रिक्त झालेल्या एक, अशा १४ पदांवर पदस्थापना करण्यात आली.

तसेच ऑगस्ट २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांवर निवडसूचीतील प्रतीक्षित कनिष्ठ सहाय्यक यांना पदोन्नती देण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये मुख्यालयात पाच, तर तालुकास्तरावर नऊ रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात आल्या. पदोन्नतीस पात्र कनिष्ठ सहाय्यक हेमराज बागूल यांनी पदोन्नती नाकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT