Exam sakal
नाशिक

ZP Bharti Exam : 460 उमेदवारांनी दिली परीक्षा; 313 परीक्षार्थींनी मारली दांडी

सकाळ वृत्तसेवा

ZP Bharti Exam : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेकडून शनिवारी (ता. ७) रिगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांसाठीची परीक्षा सुरळीत पार पडली.

जिल्ह्यातील सात परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. रिगमन (दोरखंडवाला) पदासाठी १७ परीक्षार्थींपैकी ११ परीक्षार्थी उपस्थित होते, तर सहा गैरहजर होते. वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या परीक्षेसाठी ७६२ परीक्षार्थींपैकी ४४९ परीक्षार्थी उपस्थित होते, तर ३१३ परीक्षार्थी गैरहजर होते. (zp bharti exam given by 460 candidates gave exam nashik news)

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील आठ पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवारी पदांसाठी परीक्षा पार पडली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करून परीक्षा सुरळीत सुरू असल्याबाबतची माहिती घेतली.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनीदेखील सपकाळ नॉलेज हब येथील परीक्षा केंद्राला भेट दिली.

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी जिल्हा परिषद पद भरतीसाठी वॉररूम तयार केला असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू होत असल्याबाबतची खात्री ही वॉररूमच्या माध्यमातून करण्यात येत होती.

त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर वेन्यू ऑफिसरची नेमणूक करण्यात आली होती. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना काटेकोरपणे परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रविवारी (ता. ८) विस्ताराधिकारी सांख्यिकी या पदासाठी एक हजार २८१ परीक्षार्थींनी सात केंद्रांवर परीक्षा होणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT