During the training organized at the health and family welfare training center in the district hospital, Dr. Mumbai IAT gave training to the employees. Rupal Dalal
During the training organized at the health and family welfare training center in the district hospital, Dr. Mumbai IAT gave training to the employees. Rupal Dalal esakal
नाशिक

Nashik News | मुंबई IITतर्फे 300 कर्मचाऱ्यांना स्तनपान, कुपोषण प्रशिक्षण : ZP CEO आशिमा मित्तल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत निवडलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आशा वर्कर आदींना मुंबई आयआयटी यांचेकडील कुपोषण व स्तनपानविषयक उपक्रमाकरिता प्रशिक्षण सुरू झाले आहे.

१८ मार्चपासून सदर प्रशिक्षणास सुरवात झाली असून, यात निवड झालेल्या २५१ कर्मचाऱ्यांसह ५० जिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, सेवक यांना देखील प्रशिक्षण २५ मार्चपर्यंत दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (ZP CEO Ashima Mittal announcement Breastfeeding malnutrition training to 300 employees by Mumbai IIT Nashik News)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे संकल्पनेतून आयआयटी मुंबई यांचेद्वारे बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांमधून २५० प्रशिक्षकांची निवड निश्चित केली होती.

त्यासाठी त्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांचेकडील जिल्हाभरातील २ हजार ५२८ अधिकारी व कर्मचारी (यात आशा सेविका, सेवक, पर्यंवेक्षिका, एनआरएचएम, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी) यांची ३० जानेवारी रोजी जिल्हाभरात परिक्षा घेण्यात आली होती.

पात्र २४०२ उमेदवारांपैकी २ हजार ३६२ उमेदवारांनी एकाच वेळी ही परिक्षा दिली. यासाठी या उमेदवारांना व्हिडीओच्या माध्यमातून अभ्यासक्रम देण्यात आला होता. यातून ही परिक्षा उमेदवारांनी घेतली.

सदर प्री-टेस्ट परिक्षा ही गट विकास अधिकारी यांचे नियंत्रणात गट शिक्षण अधिकारी यांचे साहाय्याने व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली विविध केंद्रावर झाली होती. या परिक्षातून २५० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

या २५० प्रशिक्षणार्थींना मुंबई आयआयटी यांचेकडील कुपोषण व स्तनपानविषयक उपक्रमाकरिता प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्हा रूग्णालयातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, आयआयटीच्या डॉ. रूपल दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ मार्च रोजी या प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला.

दररोज ५० या प्रमाणे २५ मार्चपर्यंत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर २५१ प्रशिक्षणार्थी जिल्हाभरात जाऊन, आशा सेविका, पर्यवेक्षिका, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जिल्हा कुपोषण मुक्तीसाठी हातभार लावतील.

"गर्भधारणा राहिल्यापासून पुढील एक हजार दिवस माता, बालकासाठी महत्त्वाचे असतात. या कालावधीत मातेचे दूध बालकांसाठी आवश्यक असते. मात्र, बालकास दूध मिळत नाही. यासाठी मातेकडून बालकास नियमित दूध तसेच पोषण आहार मिळावा, या दृष्टीने हे प्रशिक्षण आहे. बालक जन्मापासून त्यांची काळजी घेतल्यास कुपोषण होणार नाही. आयआयटीमधील ट्रेनर प्रशिक्षण देत आहेत. हे प्रशिक्षणार्थी आगामी सहा महिन्यात जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील." - आशिमा मित्तल, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

SCROLL FOR NEXT