ZP Nashik
ZP Nashik esakal
नाशिक

Nashik News : ZP आरोग्य विभागास सापडेना मुन्नाभाई! 3 वर्षात 31 बोगस डॉक्टरच्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई लगत असलेल्या नाशिक जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रस्थ वाढत चालले आहे. तब्बल तीन वर्षात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तब्बल ३१ बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

मात्र, आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई होत आहे. आरोग्य विभागाकडून केवळ पत्रांचा खेळ सुरू असून, एकही बोगस डॉक्टर विरोधात कारवाई झालेली नाही.

डॉक्टर नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या आरोग्याचा खेळ मांडणाऱ्या बोगस डॉक्टरांना चाप बसणार कधी, असा प्रश्न रुग्ण उपस्थित करू लागले आहेत. आरोग्य विभाग बोगस डॉक्टरकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. (ZP Health Department could not find doctor 31 bogus doctor complaints in 3 years Nashik News)

खासगी रुग्णालयात उपचार घेणे गोरगरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असून दुसरीकडे शासकीय रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याचे दिसून येते. डॉक्टरांची कमतरता, यंत्रसामुग्रीचा अभाव तसेच इतरही अनेक गोष्टींचा शासकीय रुग्णालयात अभाव असतो. परिणामी, गोरगरीब रुग्णांची मोठी परवडत होते.

मग, रुग्ण बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतात. कारण, बोगस डॉक्टरांची फी कमी असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उपचार करत असलेला डॉक्टर बोगस आहे किंवा नाही, हे रुग्णांनाही ज्ञात नसते आणि आरोग्य विभागाकडून अशा डॉक्टरांच्या शिक्षणाबाबत चौकशी केली जात नसल्याने नाशिक जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागासह गोरगरिबांची वस्ती असलेल्या ठिकाणी बोगस डॉक्टर बस्तान बसवत असल्याचे यापूर्वी उघड झालेले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी बोगस डॉक्टर नसताना डॉक्टर संदर्भात तक्रारी मागविल्या जातात.

यानुसार गत तीन वर्षात आरोग्य विभागाकडे ३१ बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. मात्र, तीन वर्षात एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई होऊ शकलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

बोगस डॉक्टर शोधण्यासाठी समिती

बोगस डॉक्टरचा शोध घेण्यासाठी तालुकानिहाय तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती असते. आरोग्य विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, आरोग्य विभाग या समितीकडे त्या-त्या तालुक्यातील तक्रारी पाठवत संबंधित डॉक्टरची शैक्षणिक अर्हतेची छाननी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल मागवित असते.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्यकडून कारवाई प्रस्तावित होते. मात्र, तीन वर्षापासून एकाही डॉक्टर विरोधात अहवाल प्राप्त झालेला नाही. आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल आणि एमबीबीएस या डिग्री व्यतिरिक्त सर्व बोगस डिग्रीधारक डॉक्टर असल्याचे गृहित धरले जाते.

तीन वर्षात तालुकानिहाय प्राप्त तक्रारी

सन २०२० - इगतपुरी (५), बागलाण (१), निफाड (२), येवला (१), नांदगाव (४), मालेगाव (१), नाशिक (१) एकूण : १५

सन २०२१- नांदगाव (४), नाशिक (१), मालेगाव (१), नाशिक महापालिका क्षेत्र (१) एकूण : ७

सन २०२२ - इगतपुरी (७), मालेगाव (१) एकूण : ८

सन २०२३ - ८ जानेवारी पर्यंत नांदगाव (१) एकूण :१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT