Eye Infection esakal
नाशिक

Nashik Eye Infection : डोळे आल्यास विद्यार्थ्यांना सुटी; शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

NCTY23B15320

सकाळ वृत्तसेवा

Nashik Eye Infection : जिल्ह्यात डोळे येण्याची साथ सुरू असल्याने एखादा विद्यार्थी बाधित झाल्यास त्याला तत्काळ सुटी देण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.

याविषयी जिल्ह्यातील शिक्षकांना अधिकृत आदेशाची प्रतीक्षा लागून होती. (ZP Primary Education Department has ordered to give immediate leave to eye infection student nashik news)

‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. २८) याविषयी बातमी प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचनांचे पत्र दिले आहे.

संततधार पावसामुळे ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना सध्या सर्दी, खोकला, ताप येण्यासह डोळे येण्याचा त्रास सुरू झाला. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका विद्यार्थ्याला त्याची लागण झाल्यास इतर विद्यार्थीही बाधित होत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक नाही, त्यांनी शाळेत न येण्याचे आवाहन शिक्षक व मुख्याध्यापक करीत आहेत. शाळा पातळीवर निर्णय घेतला जात असला तरी प्राथमिक शिक्षण विभागाकडून यासंदर्भात लेखी सूचना नव्हत्या.

अखेर शुक्रवारी शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देत वर्गशिक्षकामार्फत पालकांना कळविण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना काळजी घेण्याविषयी त्यांनी सूचनाही केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT