ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

ZP Super 100 Exam : जिल्हा परिषदेकडून ‘सुपर 100’ साठी या तारखेला परिक्षा

सकाळ वृत्तसेवा

ZP Super 100 Exam : जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर ५०’ हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर यंदा प्रशासनाने ‘सुपर १००’ उपक्रम हाती घेतला आहे. (ZP super 100 exam on 2 july nashik news)

१०० मुलांचा शोध घेण्यासाठी परिक्षा घेतली जाणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी २६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करावी लागणार असून २ जुलै रोजी या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सुपर ५०’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरिता निवासी स्वरूपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई या पात्रता परीक्षेकरीता प्रारंभी ५० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या विद्यार्थ्यांना सद्य:स्थितीत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यात येत आहे. आता नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाल्याने या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्यांत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुपर १०० विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे.

यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची एक पात्रता परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठीच्या पूर्व परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने २६ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

त्यातून पात्रता परिक्षा पास होणाऱ्या सुपर १०० विद्यार्थ्यांना दोन वर्षासाठी प्रशिक्षण व सर्व अध्यापन निवासी शाळेत निःशुल्क देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती आवश्यक राहणार आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. सदर योजना राबविण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Phaltan Woman Doctor Case:' गोपाल बदने, प्रशांत बनकरला दोन दिवसांची कोठडी'; फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, न्यायालयात काय घडलं !

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात शिवसेनेत गोंधळ; जिल्हाप्रमुखांवर विकास शिंदे यांचे थेट आरोप

Winter Health: आले थंडीचे दिवस, हृदय सांभाळा; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन, दोघांचा तीव्र झटक्याने मृत्यू

Gaur Gopal Das : 'आज आहे ते उद्या असेलच याची शाश्‍वती नाही'; गौर गोपाल दास यांचा तणावमुक्त जीवनाचा मौलिक सल्ला

SCROLL FOR NEXT