Voting News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापूर साखर कारखान्याचे आज मतदान; उद्या मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान शनिवारी (ता.२४) होणार आहे. यासाठी शुक्रवारी (ता.२३) सार्वजनिक गुजराथी हायस्कूल येथून निवडणूक कर्मचारी एसटी बस व खासगी वाहनाने रवाना झाले. निवडणूक शेतकरी विकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत आहे.

शुक्रवारी सकाळी दहाला मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सहायक निवडणूक अधिकारी नीरज चौधरी यांनी घेतले. मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप केले. कर्मचारी मतदान साहित्य तपासून आपापल्या बुथवर रवाना झाले. मतदान कामासाठी १८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Navapur Sugar Factory voting today vote counting tomorrow Nandurbar News)

यात नवापूर शहरात ६ मतदान बूथ, नवागाव ६, विसरवाडी ६, खांडबारा ४, नंदुरबार २ असे एकूण २४ मतदान बूथ आहेत. मतमोजणी २५ डिसेंबरला सार्वजनिक गुजराथी हायस्कूल येथे सकाळी साडेआठ पासून होणार आहे. मतदान हे मतपत्रिकेद्वारे होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी नीरज चौधरी यांनी दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहायक निबंधक अधिकारी भारती ठाकूर, सहायक निवडणूक अधिकारी नीरज चौधरी, क्षेत्रीय अधिकारी सचिन खैरनार, शीतल महाले, शरद चौधरी आदी लक्ष ठेऊन आहेत.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार असे : नवागाव गटातून आमदार शिरीषकुमार नाईक, विनोद नाईक. नवापूर गटातून नवलसिंग गावित, दर्शन पाटील, बापू गावित. विसरवाडी गटातून कांतिलाल गावित, नकट्या गावित, खांडबारा गटातून विजेसिंग गावित, वनसिंग गावित,नंदुरबार गटातून संजय कोकणी, अमरसिंग भामटू गावित, महिला गटातून वीणा बसावे, सयाबाई नाईक, प्रभुदास गावित, फत्तेसिंग नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर संस्था या गटातून अजित नाईक, इतर मागास वर्गातून आरिफ बलेसरिया यांची बिनविरोध निवड झाली आहे.

परिवर्तन पॅनलचे उमेदवार असे : नवागाव गटातून हरिदास गावित, नवापूर गटातून आलू गावित, देवराम गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, विसरवाडी गटातून बकाराम गावित, रमेश गावित, खांडबारा गटातून लक्ष्मण कोकणी, रावजी वळवी, नंदुरबार गटातून जगन कोकणी, रुद्राबाई वसावे, मीराबाई गावित, संगीता गावित, सीताराम ठाकरे, रमेशचंद्र राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT