उत्तर महाराष्ट्र

"औरंगाबादहून जळगाव यायचं म्हंटलं तर सुरवातीला अंग चेपायची व्यवस्था करावी लागते" - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. यात औरंगाबादहून जळगाव यायचे म्हटले; तर सुरवातीला अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते", असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

चोपडा येथील तापी सहकारी सूतगिरणीच्या 25 हजार चात्यांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. एखाद्या जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात जाताना गाडीने जाता आले; तर त्या ठिकाणची शेतीची परिस्थिती व परिसरातील वस्तुस्थितीची माहिती घेता येते. रस्त्याने जाताना भेटी घेता येतात. मात्र आज हेलिकॅप्टर यावे लागले. रस्ते बरोबर नाहीत याची खंत वाटते. सुदैवाने सरकार बदललेले आहे. काही कालावधीतच रस्ते चांगले होतील. दोन कामे कमी झाली तरी चालतील, मात्र अधिक लोकांच्या हातांना काम देऊन विकास कामे करण्याचा सल्ला मी महाविकास आघाडीला दिला आहे असल्याचे त्यांनी सांगितले

होय मी पिकवणाऱ्यांचा विचार करतो

“मला सगळे म्हणतात की, मी पिकवणाऱ्यांचा विचार जास्त करतो. हो, हे खरं आहे; कारण पिकवणारा जगला तर खाणारे जगतात. देशात शहरी संस्कृतीकडे कल आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांविषयी दृष्टिकोन वेगळा आहे. शेतकरी जास्त पिकवेल आणि खाणाऱ्यांची गरज भागेल, असा दुहेरी प्रोग्रॅम राबविण्याची सध्या गरज आहे. शेतीमध्ये गुंतवणुकीची गरज आहे. या गुंतवणुकीमुळे बेकारी दूर करण्यासाठीदेखील मदत होईल. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ठरवले आहे की राज्याच्या हिताचं विचार करायचा आणि यासाठी सत्तेचा वापर करायचा”, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं.

ncp president sharad pawar comments sarcastically on bad roads between aurangabad and jalgaon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT