crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : निजामपूरला क्रीडामंडळावर छापा; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : निजामपूर (ता. साक्री) येथे सोशल क्रीडामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर ‘एलसीबी’च्या पथकाने बुधवारी (ता. ६) छापा टाकला. या कारवाईत दहा संशयितांना पकडले.

तसेच रोकडसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (Nizampur sports association raided seized 4 lakh worth of goods dhule crime news)

निजामपूरमधील वासखेडी रोडवरील नॅशनल सोशल सांस्कृतिक क्रीडामंडळ येथे काही जण ५२ पत्त्यांच्या कॅटद्वारे तीन पत्तीचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती ‘एलसीबी’ला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकत दहा जणांना रंगेहाथ पकडले.

त्यात संजय सुदाम जयस्वाल, रवींद्र नारायण पवार, मुस्ताकिन अरमान शहा, दिलीप आसाराम धनगर, बबन उत्तम खलाणे, बारकू वंजी बच्छाव, संदीप भगवान भलकारे, नाजीम जब्बार शहा, दिलीप दगा धनगर, दिलीप शंकर अहिरे (रा. जैताणे, ता. साक्री) यांचा समावेश आहे.

त्यांच्याकडून रोकडसह जुगाराचे साहित्य, मोबाईल व दुचाकी असा एकूण चार लाख सहा हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, योगेश राऊत, दिलीप खोंडे, देवेंद्र ठाकूर, राजू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT