nashik hospital.jpg 
उत्तर महाराष्ट्र

फक्त सर्दी-पडशापुरती उरली महापालिका रुग्णालये! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांत सर्व आजारांवर उपचार होतात हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. कारण महापालिकेच्या रुग्णालयात सर्दी, खोकला या किरकोळ आजारांवरच उपचार होत असल्याची बाब समोर आली आहे. मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञच नसल्याने महापालिकेची रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रे झाली असून, याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल 52 पदे रिक्त असल्याचे कारण दिले जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या व्याख्येत बसणारे डॉक्‍टर रुग्णालयांत सेवा देण्यास तयार नसल्याची कबुली महापालिकेकडून देण्यात आली आहे. 

तज्ज्ञ डॉक्‍टरांची वानवा..५२ पदे रिक्त
वीस लाख लोकसंख्या असलेल्या नाशिक शहराचा समावेश टू टायर सिटीमध्ये होतो. महापालिकेला "ब' वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सेवादेखील लोकसंख्या व दर्जाप्रमाणे असायला हव्यात. पायाभूत सुविधा त्याप्रमाणात असल्या तरी सेवा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या आहेत. शहरात डॉ. झाकिर हुसेन, जे.डी. सी. बिटको, मोरवाडी, पंचवटीतील इंदिरा गांधी ही मोठी रुग्णालये आहेत. त्याव्यतिरिक्त वीसहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या माध्यमातून रोज चार ते पाच हजार रुग्णांवर उपचार केला जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु रुग्ण संख्येचा आकडा बघता त्यावर विश्‍वास बसणार नाही. त्याला कारण म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावातून समोर आले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला व महिलांवरील उपचार एवढ्यापुरतेच काम मर्यादित राहिले आहे. 

मोठ्या आजारांसाठी खासगी रुग्णालये 
उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, विषबाधा, सर्पदंश, हृदययरोग, किडनीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असताना या आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत. आस्थापनेवर 105 पदे मंजूर आहेत. त्यातील तब्बल 52 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांपैकी 27 पदे मानधनावर भरली असली तरी रुग्णालयाचे कायम वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात व मानधनावरील डॉक्‍टरांमध्ये वाद आहे. मानधनावरील डॉक्‍टरांना उपचाराऐवजी अन्य कामे दिली जात असल्याची तक्रार मानधनावरील डॉक्‍टरांची आहे. त्यामुळे त्या डॉक्‍टरांचे काम मानधन घेण्यापुरतेच मर्यादित झाले आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना नाइलाजाने खासगी मोठ्या रुग्णालयांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

नोराचं अश्लील गाणं लिहिणाऱ्या गीतकाराला चक्क मिळालाय ऑस्कर! प्रकरण अंगावर आल्यास पलटला, 'या' व्यक्तीवर फोडलं खापर!

Pune Crime News : धक्कादायक घटनेने पुणे हादरले ! समलिंगी संबंधाला विरोध केल्याने १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, संशयित तरुण ताब्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीला सुरुवात

Kavya Maran: '२.३४ कोटी पाकिस्तानी खेळाडूवर खर्च...' काव्या मारनला ललित मोदींचा नाव न घेताही स्पष्ट मेसेज

SCROLL FOR NEXT