Players participating in the cricket tournament above forty years.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : वयस्कर खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर; तळोद्यात सामन्यांची चाहत्यांना मेजवानी

दिग्गज मैदान गाजवताना दिसणार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : एप्रिल व मे महिना क्रिकेट चाहत्यांना ९० च्या दशकात पुन्हा घेऊन जाणारा ठरणारा आहे. आफ्टर ४० क्रिकेट लीग या निमित्त २५ ते ३० वर्षांपूर्वी तळोदा तालुक्यातील मैदान गाजवणारे खेळाडू पुन्हा मैदानावर उतरले आहेत. (occasion of After 40 Cricket League players who graced field in Taloda taluka 25 to 30 years ago will play cricket again Nandurbar News)

अक्षयतृतीयेपासून या क्रिकेट लीगचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा ऐन सुट्टीच्या कालावधीत दिग्गज मैदान गाजवताना दिसणार आहेत.

तळोदा शहर एकेकाळी क्रिकेटसाठी ओळखले जायचे, तालुक्यातील खेळाडू विविध ठिकाणी जाऊन मैदान गाजवत असे. त्यामुळे त्यांच्या मैदानावरील क्रिकेटचे किस्से आजही क्रीडाप्रेमींना ऐकवले जातात. क्रीडा क्षेत्रात वैभव परंपरा असलेल्या १९९० चा दशकात खेळणारे खेळाडू आज शिक्षक, क्रीडा शिक्षक, व्यावसायिक, नगरसेवक, प्रगतिशील शेतकरी तसेच, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यासह अन्य महत्त्वाच्या व मोठ्या हुद्द्यावर आहेत.

आता पुन्हा ते मैदानावर परतले आहेत. टेनिस बॉलवर १२ ओव्हर्सचे सामने होत आहेत. शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात हे सामने खेळविले जात आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना शहरातील दिग्गज खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तरुण खेळाडूंना देखील याचा फायदा होणार आहे. याशिवाय एकेकाळी मैदान गाजविणारे खेळाडू वयाची चाळिशी उलटल्यानंतर कसे खेळतात हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मैदानावर चौकार षटकारांसोबत चेंडूच्या मागे धावताना होणारी गंमत व थरारामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. या स्पर्धेत शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांच्या कडून विजयी संघाला ट्रॉफी देण्यात येणार असून तळोदा शहर व तालुक्यातील असंख्य खेळाडू घडविणारे दिवंगत क्रीडा मार्गदर्शक प्रा. पी. पी. भोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले असून त्यांचे शिष्य प्रा. विलास डामरे, प्रा. प्रशांत माळी यांच्यासह माजी खेळाडू व ज्येष्ठ खेळाडू यांचे सहकार्य स्पर्धेला लाभत आहे.

सहा संघांचा सहभाग

९० चे दशक गाजवणाऱ्या सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी तळोदा येथील क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला असून सोशल मीडियावर समूह तयार करून याबाबत खेळाडूंना अवगत केले आहे.

प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे पाहून स्वतःच आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन मैदानावर उतरून मैदान आखणे, खेळपट्टी तयार करणे, त्यावर पाणी मारणे, रोलिंग करण्याचे कामे हाती घेतले आहे. दररोज खेळाडू वाढत गेली, त्यांचे अर्ज भरून घेतले.

सुमारे ७० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. वेळोवेळी बैठका घेऊन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ६ संघ तयार झाले असून टेनिस बॉलवर ही स्पर्धा खेळली जात आहे.

संघांना क्रिकेटपटूंची नावे

(स्व) रणछोड गुरुजी क्रीडा मंडळ तर्फे झालेल्या चाळीस वर्षावरील खेळाडूंच्या या क्रिकेट स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येत आहेत. या स्पर्धेतील संघाना भारतीय क्रिकेट संघाचे सर्वश्रेष्ठ खेळाडू यांची नावे देण्यात आली आहेत. त्यात कपिल देव संघ, सुनील गावसकर संघ, राहुल द्रविड संघ, सौरभ गांगुली संघ, सचिन तेंडुलकर संघ, जहीर खान संघ अशी नावे संघाना देण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT