Oldest Krishi Tantra Vidyalaya esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Krishi Tantra Vidyalay : सर्वांत जुने धुळे कृषी तंत्र विद्यालय; शताब्दी वर्ष

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील कृषी तंत्र विद्यालय राज्यातील सर्वांत जुने आहे. राज्यातील अग्रगण्य राहुरीस्थित महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आठ शासकीय कृषी तंत्र विद्यालये येतात. (Oldest Krishi Tantra Vidyalaya is in Dhule news)

ते धुळे, जळगाव, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. पैकी सर्वांत जुने कृषी तंत्र विद्यालय येथे एप्रिल १९२३ ला प्रथम सुरू करण्यात आले.

स्थापनेनंतर येथील कृषी तंत्र विद्यालय १९७४ ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे वर्ग झाले. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या आणि कृषी उद्योजकांना आवश्यक असणारे प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे कार्य करणाऱ्या या विद्यालयाची येथे एक एप्रिल १९२३ मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापना केली.

१९४६ मध्ये त्या वेळच्या मुंबई प्रांतात लोकशाही सरकार अधिकारावर आल्यानंतर सरकारने प्रामुख्याने शेतकी शिक्षणाकडे लक्ष पुरविले. त्यात १९४७ ला येथील कृषी तंत्र विद्यालय ताब्यात घेतले. पुढे १ मे १९६२ मध्ये हे कृषी तंत्र विद्यालय धुळे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. जिल्हा परिषदेने ते १९६२ ते १९७४ पर्यंत चालविले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बिजोत्पादनाचा कार्यक्रम

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर येथील कृषी तंत्र विद्यालय एक एप्रिल १९७४ ला विद्यापीठाकडे वर्ग झाले. नंतर धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची स्वतंत्रपणे स्थापना झाल्यामुळे हे कृषी तंत्र विद्यालय या दोन्ही जिल्ह्यांसाठी घटक कृषी तंत्र विद्यालय म्हणून काम पाहते.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालये महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न आहेत. वेगवेगळी शैक्षणिक कामे या घटक कृषी तंत्र विद्यालयामार्फत केली जातात. तसेच, विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर खरीप व रब्बी बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो.

कृषी आधारित सहा उद्योग

कृषी उद्योजकांना आवश्यक प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे कार्य हे विद्यालय करीत असून या विद्यालयाचे विद्यार्थी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, वनरक्षक आदी पदावर सेवा बजावत आहेत. या विद्यालयामार्फत सहा कृषी आधारित उद्योगांची उभारणी करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या विद्यालयाच्या अधिनस्त साक्री, बोराडी (ता. शिरपूर), मेहरगाव (ता. धुळे), मंदाणे (ता. शहादा), उमरदे (ता. नंदुरबार) आणि रांझणी (ता. तळोदा) या विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालयामार्फत धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कृषी तंत्र अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.

कृषी शिक्षणाचे कार्य

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कृषीचे अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरोटे, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाची वाटचाल सुरू आहे. विद्यालयामार्फत अधिकाधिक प्रत्यक्ष कार्यानुभवाने कृषी शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे कार्य प्राचार्य डॉ. राहुल देसले, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. संजय आगळे, स्वाती भारूड आणि इतर कर्मचारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT