Abid BABY 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये...नंतर.....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या भांड्यात पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाथरुममधील टबमध्ये बुडून या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. घडलेल्या घटनेनंतर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

बाळाला जेऊ घालत होती..पण पतीचा फोन आला अन् ती गेली

रविवारी (ता.१) रात्री कुटुंबीयांनी जेवण केले. फुलमती अबिदला जेऊ घालतच होती. अचानक त्यांना पतीचा फोन आला. फोनवर बोलत बोलत अबिदची आई बाल्कनीत गेली. आईचे दुर्लक्ष असतानाच अबिद हा बाथरुममध्ये गेला. तेथे पाण्याने भरलेला टब होता. त्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला. अबिदच्या मृत्यूमुळे आईने एकच आक्रोश केला.या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घडलेल्या घटनेनंतर शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

तिची नुकतीच प्रसुती झाली होती...

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरनगर समोरील डीजीपीनगर येथे रविवारी ही घटना घडली.अबिद मोहित शेख (वय 1 वर्षे) याची मावशी डीजीपीनगर संतोषीमाता नगर येथील साईर कुटीर सोसायटीत राहते. तिची नुकतीच प्रसुती झाली. तिची बहीण फुलमती खातून ही आपला लहान मुलगा अबिदला घेऊन बहिणीच्या घरी गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT