Onion News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Onion News : धुळे बाजार समितीत कांदा विक्री बंद; तणाव टाळण्यासाठी निर्णय घेतल्याची व्यापाऱ्यांची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

Dhule Onion Market News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. केंद्र सरकारने निर्यातशुल्क आकारल्याने शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल विकावा लागेल.

त्यात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात तणाव निर्माण होईल. तसे होऊ नये यासाठी आम्ही कांदा खरेदीची प्रक्रिया थांबवितो, असे म्हणत व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया थांबविली आहे. (Onion sales stopped in Dhule market committee news)

जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. त्यांच्या‍कडून कांदा विकण्याची वेळ असते, त्या वेळी अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. आता कांदा निर्यातीवर मिळणाऱ्या दराच्या तुलनेत ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

या निर्णयाचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. अनेक शेतकरी कांदा निर्यात करू शकणार नाहीत. दुसरीकडे कांदा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना कांदा वेळीच विकणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशा स्थितीत स्थानिक पातळीवर कवडीमोल कांदा विकण्याची वेळ येईल. त्या वेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद होतील.

ती स्थिती टाळण्यासाठी आम्ही कांदा लिलाव बंद करीत आहोत, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. शेतकरी सभासद असलेल्या बाजार समितीसह खासगी बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्राच्या निर्णयाचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT