Police Force esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar: जिल्हा पोलिस दलाकडून ऑपरेशन ऑलआउट, कोम्बिंग! नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षकांचा पहिल्याच दिवसापासून धडाका

नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे ३ ते ६ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात ऑपरेशन ऑलआउट, कोम्बिंग, नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे ३ ते ६ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात ऑपरेशन ऑलआउट, कोम्बिंग, नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑलआउट राबविण्याबाबत नियोजन केले होते.

त्यात अवैध धंद्यांविरुद्ध तसेच पोलिस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, स्टँडिंग वॉरंट, फरारी, पाहिजे आरोपी, तसेच बेलेबल व नॉन बेलेबल वॉरंट बजावणी या बाबींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली.

त्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे व लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच खळबळ उडाली आहे. (Operation All Out Combing by District Police Force newly appointed District Superintendent of Police from very first day Nandurbar news)

तीन दिवसांचे ऑपरेशन ऑलआउटदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात पोलिस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्यामार्फत करण्यात आलेली कारवाई अशी ः अवैध जुगाराच्या ३३ कारवाया करण्यात आल्या असून, त्यामध्ये ७२ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैधरीत्या दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ६१ कारवाया करण्यात आल्या असून, त्यामध्ये ११ लाख एक हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाहिजे, फरारी व स्टँडिंग वॉरंट आरोपींपैकी २९ जणांना अटक करण्यात आली. बेलेबल व नॉन बेलेबल वॉरंट असे एकूण १२४ बजावणी करण्यात यश मिळाले.

अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडर हे वाहनांमध्ये गॅस भरण्याकामी वापरणाऱ्यांविरुद्ध जीवनाश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई करून दोन लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

यापुढेदेखील अवैध धंद्यांवर जिल्ह्यात वेळोवेळी कडक कारवाई करण्याच्या पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी जिल्हा पोलिस दलास सक्त सूचना दिल्या.

"जिल्ह्यात चुकीचे काम होत असेल, सर्वसामान्य जनतेच्या काही अडचणी असल्यास अथवा अवैध-बेकायदा धंद्यांविषयी कुठल्याही प्रकारची माहिती सामान्य नागरिकांना अवगत असल्यास त्यांनी माझ्या ९८४९०६५६२९ या मोबाईल क्रमांकावर तत्काळ कळवावे, ओळख/माहिती गोपनीय ठेवण्यात येईल."-श्रवण दत्त एस., जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत मोठा निर्णय ! शेल्टर होममध्ये ठेवता येणार नाही, नसबंदी हाच योग्य उपाय

AUS vs SA 2nd ODI: १९८७ नंतर वन डेत चमत्कार! भारताच्या दिग्गजानंतर 'हा' पराक्रम करणारा मॅथ्यू ब्रित्झके दुसराच फलंदाज ठरला

"आई अचानक आम्हाला सोडून गेली आणि.." ज्योती चांदेकरांच्या लेकीची आईच्या आठवणीत भावूक पोस्ट

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Raisin Trader Fraud : पन्नास लाख रुपयांऐवजी कोऱ्या कागदांचे दिले बंडल, बेदाणा व्यापाऱ्याकडून दिल्लीतून साथीदारांनी उचलली रक्कम

SCROLL FOR NEXT