While inspecting the crops, the crop conservator P. C. Kunde, Sub Divisional Agriculture Officer T. V. Kharde, etc.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : तळोदा तालुक्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव; असे करा लष्करी अळीचे व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : वातावरणातील बदलामुळे तळोदा तालुक्यात काही ठिकाणी विशेषतः मका व ज्वारी या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे कीडनाशकाची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.

त्यामुळे तालुक्यातील शिर्वे, मेंढवड व नळगव्हाण येथे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांना पिकांवरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. (Outbreak of armyworm in Taloda taluka Nandurbar Agriculture News )

यंदाच्या खरीप हंगामात तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका व ज्वारीच्या पिकाला चांगली पसंती दिली आहे. सुमारे ७४० हेक्टरवर ज्वारी, तर ५६० हेक्टरवर मक्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतात पिके डोलू लागली आहेत.

मात्र पिके जोमात आली असतानाच यावर विशेषतः मका, ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळीमुळे मका, ज्वारीच्या पिकांची पाने कुरतडली जात असून, पिकांच्या वाढीवरदेखील परिणाम होत आहे. योग्य व्यवस्थापन करूनही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

मक्याची उगवण झाल्यावर लागलीच फवारणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. तसेच कीटकनाशकांची फवारणी करूनही पुन्हा अळीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली असून, शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अधिकाऱ्यांकडून पिकांची पाहणी

शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्यासाठी तळोदा तालुक्यातील शिर्वे, मेंढवड व नळगव्हाण येथे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. मका, ज्वारीच्या पिकातून अधिक उत्पादन घेण्यासाठी व त्यावर प्रादुर्भाव करणाऱ्या लष्करी अळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दिला.

सोबतच उपाययोजनादेखील सुचविल्यात. या वेळी कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षक पी. सी. कुंदे, उपविभागीय कृषी अधिकारी टी. व्ही. खर्डे, तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी, मंडळ कृषी अधिकारी आर. आर. मंचरे, कृषी पर्यवेक्षक सोनवणे, कृषी सहाय्यक रामदास पावरा, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

लष्करी अळीचे व्यवस्थापन

-आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी.

-मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षीथांबे उभारावेत.

-पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.

-मक्यावरील लष्करी अळीसाठी एकरी सहा-सात कामगंध सापळे लावावेत.

-किडींचे नैसर्गिक शत्रू उदा. परभक्षी व परोपजीवी कीटक यांचे संवर्धन करावे. त्यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावीत.

-पोंगा व्यवस्थित तयार होईल, त्या वेळी माती आणि राख किंवा चुना मिश्रण त्यात टाकावे.

-प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीवर गेल्यास द्रावण पोंग्यात जाईल अशी फवारणी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT