ST Bus News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : अहो आश्चर्यम..! नंदुरबार-धुळे बसप्रवास चक्क 6 तासांचा....

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्यांची जीवनवाहिनी ठरलेली एसटी कधी-कधी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते. अहो आश्चर्य म्हणजे नंदुरबारहून धुळ्याला जाण्यासाठी तब्बल सहा तासांचा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. (passengers struggle to push nandurbar dhule st bus nandurbar news)

शुक्रवार (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास नंदुरबार आगारातून लालपरी (एमएच २० बीएल १४२०) मार्गस्थ झाली. मात्र दीड ते पावणेदोनच्या सुमारास धावडे गावानजीक बस नादुरुस्त झाली. प्रवाशांनी उतरून बसला धक्का देण्याचा प्रयत्न केला; परंतु कालबाह्य झालेली बस जागेवरून हलण्याचे नाव घेत नव्हती.

तब्बल दोन तास प्रवासी उन्हात ताटकळत उभे राहिले. चालक वाहकासह संतप्त आणि त्रस्त प्रवाशांनी नंदुरबार आणि दोंडाईचा आगारात वारंवार संपर्क करूनदेखील कुणीही प्रतिसाद दिला नाही. लग्नसमारंभाचा हंगाम आणि सुट्या असताना नंदुरबार आगारातून धुळ्यासाठी वाढती प्रवासीसंख्या असून, बस उपलब्ध होऊ शकली नाही.

यामुळे नंदुरबार ते धुळे ९० किलोमीटर तब्बल सहा तासांचा प्रवास सहन करीत प्रवाशांना मनस्ताप झाला. दोन तास उन्हात थांबल्यानंतर नंदुरबार-चाळीसगाव बस आली. त्यातही अर्धवट प्रवाशांना धुळ्यासाठी घेण्यात आले. यामुळेच नंदुरबार ते धुळे असा सहा तासांचा प्रवास करण्याची वेळ आल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नवीन बस तातडीने द्या

गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार आगाराला नवीन बस प्राप्त होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र याबाबत अद्याप अंमलबजावणी झालेली दिसत नाही. सवलतीच्या तिकीटदरांमुळे दररोज एसटी बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी चांगल्या स्थितीतील नवीन बस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी धुळे विभागीय नियंत्रक विजय गिते यांच्याकडे केली आहे.

नंदुरबार आगार वाऱ्यावर

नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार यांच्या बदली नंतर मोरे नामक आगारप्रमुख आले. मात्र त्यांनीदेखील दोनच दिवसांत पदभार सोडून इतरत्र जाणे पसंत केले. यामुळे नंदुरबार आगारावर कुणाचेही नियंत्रण राहिले नसून वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT