MSRTC Android Machine  esakal
उत्तर महाराष्ट्र

MSRTC Android Machine : एसटीच्या अँड्रॉइड मशिनची प्रवाशांना प्रतीक्षाच

सुट्या पैशांचा वाद टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा

सकाळ वृत्तसेवा

बामखेडा (जि. नंदुरबार) : प्रवाशांचा वेळ व पैसा वाचावा व एसटीचा प्रवास सुलभ व्हावा अन् प्रवाशांना ऑनलाइन पेमेंट करता यावे, यासाठी महामंडळ अँड्रॉइड मशिन उपलब्ध करून देणार होते; मात्र अद्याप ही मशिनरी मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांसह वाहकांनाही मशिनची प्रतीक्षा आहे. (Passengers waiting for Android Machine of msrtc nandurbar news)

एसटीचा प्रवास करताना सुट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात. ही समस्या सोडविण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने अँड्रॉइड मशिन देण्याचे नियोजन केले आहे. मशिनमुळे प्रवाशांना तिकिटाची रक्कम थेट ऑनलाइन देता येते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या मशिन उपलब्ध झाल्या असल्या, तरी काही जिल्ह्यांत मात्र अद्यापही उपलब्ध नाहीत. त्यामुळे जुनी समस्या कायम आहे. प्रवाशांना सुटे पैसे घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

अँड्रॉइड मशिनच उपलब्ध नाही

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या मशिन आल्या आहेत. त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला नसून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. बाकीच्या जिल्ह्यात अद्याप मशिन उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे अजून काही काळ या मशिनची वाट पाहावी लागेल.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

ना कार्ड पेमेंट, ना गुगलपे, फोनपे

सध्याच्या डिजिटल युगात सर्वच ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एसटीत नव्याने उपलब्ध होणाऱ्या या मशिनद्वारे कार्ड पेमेंट करता येणार आहे. जिल्ह्याला मशिन उपलब्ध झाल्या नसल्याने सध्या तरी कार्ड पेमेंट, गुगलपे, फोनपे यांसारख्या डिजिटलचा वापर प्रवाशांना करता येत नाही.

मोफत प्रवास; त्यांनाही शून्य रकमेचे तिकीट

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना सवलत जाहीर केली आहे. त्यांच्यासाठी मोफत प्रवास असला, तरी त्यांना शून्य रकमेचे तिकीट देण्यात येत असून, त्यावर ‘अमृतमहोत्सव ज्येष्ठ नागरिक सवलत’ असे लिहिलेले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT