Municipal team sealing office of Pingle Vidyalaya for tax collection.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Tax Recovery : पिंगळे विद्यालयाचे कार्यालय सील; मालमत्ता करवसुलीसाठी महापालिका पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील मोगलाईतील सुदाम पिंगळे मेमोरिअल ट्रस्टच्या श्रीमती शांताबाई पिंगळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कार्यालयाला महापालिकेच्या करवसुली पथकाने सील ठोकले. महापालिकेचा पाच लाख ८५ हजार २१ रुपयांचा मालमत्ता कर (Tax Recovery) थकविल्याने ही कारवाई करण्यात आली. (Pingle Vidyalaya office sealed by municipal team for property tax collection dhule news)

महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी शहरातील मालमत्ताधारकांकडून थकीत करवसुलीसाठी धडक मोहीम राबविली आहे. यासाठी स्वतंत्र वसुली पथकाची स्थापना करण्यात आली असून, हे पथक बड्या थकबाकीदारांकडे वसुली मोहीम राबवीत आहे.

त्यात गुरुवारी सकाळी श्रीमती शांताबाई पिंगळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कार्यालयाला वसुली पथकाने थकीत रकमेची मागणी केली. ही रक्कम तत्काळ भरण्यास असमर्थता दर्शविण्यात आल्याने कार्यालयास सील ठोकण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पथकातील वसुली अधिकारी शिरीष जाधव, मधुकर निकुंभे, निरीक्षक मनोज चिलंदे, अनिल जोशी, अशोक चौधरी, अशोक सूर्यवंशी, किशोर शिंदे, विद्या करडक, श्रीमती पटाईत यांनी ही कारवाई केली. विद्यालयाकडे गेल्या १२ वर्षांपासून मालमत्ता करापोटी तब्बल पाच लाख ८५ हजार २१ रुपये थकीत होते. मालमत्ताधारकांनी थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

Kelva Beach: वीकेंडला निसर्गाचा आनंद घ्यायचा? मग डहाणू ट्रेनने निघा आणि थेट ‘केळवा बीच’वर पोहोचा

Maharashtra Politics:'सुशीलकुमार शिंदेंच्या गुगलींवर शरद पवारांचा गुड लेफ्ट'; बॅटिंग टाळली, जुन्या आठवणींना उजाळा..

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

SCROLL FOR NEXT