scholarship scheme esakal
उत्तर महाराष्ट्र

PM Scholarship Scheme : माजी सैनिक पाल्यांना अर्जासाठी आवाहन; या संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

PM Scholarship Scheme : पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२०२४ साठी माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील यांनी केले. (PM Scholarship Scheme Ex servicemen children are appeal to apply dhule news)

नवी दिल्लीस्थित केंद्रीय सैनिक बोर्डामार्फत माजी सैनिक, विधवांच्या पाल्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

बारावी, डिप्लोमा व पदवी परीक्षांमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊन ज्यांनी इंजिनिअरिंग, बी.टेक., एमबीबीएस, बीडीएस, बीएड, बीबीए, बी. फॉर्म, बीसीए, एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची माहिती व ऑनलाइन अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, संबंधित पाल्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावा.

कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीकरिता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, संतोषीमाता चौकाजवळ, धुळे (०२५६२-२३७२६४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT