police with suspect and poclain machine esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जंगल सपाट करणारे पोकलेन शिरपूर येथे जप्त

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : होऱ्यापाणी (ता. शिरपूर) येथील वनक्षेत्रात शेतीसाठी जंगल (Forest) सपाट करताना पोकलेन यंत्र (Poclain Machine) वन विभागाने जप्त केले.(Poclain Machine was seized by Forest Department while leveling forest for agriculture in forest area dhule news)

या कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. होऱ्या‍पाणीजवळ पिंप्राळा येथील वनक्षेत्रात ४ फेब्रुवारीला जंगल सपाटीकरणाचे काम अवैधरीत्या सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

सहाय्यक वनसंरक्षक आनंद मेश्राम, वनक्षेत्रपाल के. डी. देवरे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने जाऊन पाहणी केली असता पोकलेन (एमएच १५, जीएफ ३४९५) अवैध खोदकाम व सपाटीकरण करीत असल्याचे आढळले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

पोकलेन यंत्र जप्त करून त्यासोबत असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली. संशयितांमध्ये पोकलेनचालक चूडामण कुमार शहा, राजेंद्र अरुण चव्हाण, बाबूलाल भगवान कोकणी (तिघे रा. सांगवी, ता. शिरपूर), जामलाल टिका पावरा व सुरेश टिका पावरा (दोघे रा. डाबक्यापाडा, ता. शिरपूर) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Arms Smuggling India : पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हाय-क्वालिटी बंदुका भारतात; सिकंदर शेख प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Pandharpur Politics : 'पाटलांच्या पराभवासाठीच शिंदेंचा भाजप प्रवेश'; मंत्री जयकुमार गोरेंचा आमदार पाटलांना सूचक इशारा

Nashik Kumbh Mela : ऐतिहासिक निर्णय! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या 66 किमी परिक्रमा मार्गाला 7,922 कोटींचा 'हिरवा कंदील'

Black Friday Sale : फक्त 1 रुपया देऊन घरी न्या AC, TV अन् फ्रिज! दिवाळीला सुद्धा विकलं गेलं नाही इतक स्वस्त सामान, ऑफर पाहा एका क्लिकवर

Arnav Khaire Death: भाषेचं विषारी राजकारण, तुमच्या मुलांसाठी मराठी मुलाचा जीव घेणार का? चित्रा वाघ यांचा सवाल

SCROLL FOR NEXT