truck with iron plate esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : लोखंडी प्लेट लांबविणाऱ्या चोरट्यांना काही तासांतच बेड्या

सकाळ वृत्तसेवा

धुळे : वार (ता. धुळे) गावातील पांझरेवरील बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट (Iron Plate) लांबविणाऱ्या चोरट्यांना पश्‍चिम देवपूर पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या. वाहनासह चोरीस गेलेल्या प्लेट पोलिसांनी हस्तगत केल्या. (police arrested thieves who were extending iron plate of dam on Panzara within few hours Dhule news)

वार गावातील पांझरा नदीवरील बंधाऱ्यावर पाणी अडविण्यासाठी वापरात असलेल्या लोखंडी प्लेट चोरीची घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळी उघडकीस आली.

याबाबत पाटबंधारेच्या सहाय्यक अभियंता प्रणाली अहिरराव यांनी देवपूर पश्‍चिम पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपासचक्रे फिरविली. बंधाऱ्यावरील लोखंडी प्लेट चोरट्यांनी वार शिवारातच एका वाहनात लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना समजली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मेंद्र मोहिते, हवालदार मुक्तार शेख, सुनील राठोड, गौतम महिरे, नीलेश हल्लोरे यांनी संशयित वाहनाचा शोध घेत मध्यरात्रीच्या सुमारास वाहनासह संशयितांना ताब्यात घेतले.

वाहनात दहा हजार रुपये किमतीच्या २४ लोखंडी प्लेट असा एकूण दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धर्मेंद्र मोहिते तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT