crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : हाडाखेडजवळ 11 लाखांचा गुटखा भरलेला ट्रक पकडला

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्याजवळ ट्रकमधून पोलिसांनी ११ लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखू जप्त केला.

प्रतीक जोशी

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्याजवळ ट्रकमधून पोलिसांनी ११ लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखू जप्त केला.

शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेआठला ही कारवाई करताना पोलिसांनी चालकाला अटक केली. (Police seized gutkha panmasala and tobacco worth Rs 11 lakh from truck near border check post at Hadakhed dhule crime news)

सेंधव्याकडून शिरपूरकडे गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून उपनिरीक्षक कृष्णा पाटील व सहकारी पेट्रोलिंग करीत होते.

सकाळी हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी संशयित आयशर ट्रक (डीडी ०१, जी ९२४२)ला अडविले.

चालक धर्मेंद्र सजन राव (वय ३१, रा. पोलाय, ता. बागली, जि. देवास, मध्य प्रदेश) याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. त्यात साडेसात लाख रुपयांची स्वीट सुपारी, ७० हजार रुपये किमतीचा गुटखा, सव्वातीन लाखांचा पानमसाला, ५२ हजार रुपयांची तंबाखू असा मुद्देमाल आढळला.

पोलिसांनी संशयिताला अटक केली. ट्रकसह मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख ७० हजार ३८६ रुपये आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT