residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

आयुष्यातील आव्हाने..आईचे काबाडकष्ट...अन् मुलांचा उध्दार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विजया पवार यांची कहाणी काही औरच. १२ वर्षांपूर्वी लग्न झालेले. आश्रमशाळेत परिचर असलेले पती. विजया या मूळचा नाशिकच्या पंचवटीतील अमृतधाम परिसरातील. त्यांचे सासर शहाद्याचे;पती नाशिकजवळच असलेल्या आश्रमशाळेत असल्याने त्या नाशिकमध्येच. त्यांना 11 वर्षांचा मुलगा नैतिक अन्‌ चार वर्षांची मुलगी अनन्या आहे.

आरक्षणामुळे अडचण

कला शाखेची पदवी घेतल्यानंतरही गृहिणी म्हणूनच जबाबदारी पार पाडत असताना, दोन वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा राज्यसेवेची परीक्षा दिली. त्या परीक्षा उत्तीर्णही झाल्या; परंतु आरक्षणासंदर्भातील अडचणीत प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना पोलिस उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणाला जाता आले नाही. त्यामुळे पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्या. विजया या जेव्हा पोलिस अकादमीत प्रशिक्षणासाठी आल्या. त्यावेळी त्यांचे वजन होते 78 किलो.,

आईचे उपकार... तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण

त्यानंतर जे परिश्रम घेतले त्यामुळे काही महिन्यांत त्यांचे वजन तब्बल 22 किलोने कमी झाले. त्यांच्या आईने काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. नव्हे, तर सुशिक्षितही केले. यात एकीला शिक्षिका, तर दोघी बहिणी एकाच वेळी पोलिस उपनिरीक्षकाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि प्रशिक्षणही सोबतच केले. वडिलांचे बालपणीच जाणे आणि एकुलत्या भावाचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन. आयुष्यातील आव्हाने पेलताना समाजाला न्याय देण्यासाठीच प्रयत्नशील राहू, अशीच प्रतिज्ञा महिला प्रशिक्षणार्थींत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विजया पवार यांनी केली. 

हेही वाचा > अगदी दुष्काळी छावण्यांत राहण्याचीही 'त्याच्या'वर वेळ आली....तरीही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Prashant Raut Memorial: तुझ्यामुळे ‘सरणा’साठी जागा मिळाली, स्मारकासाठी आम्ही अपयशी; दोन दशकापासून ‘शहीद प्रशांत राऊत’ स्मारकासाठी उदासीनता!

SCROLL FOR NEXT