Vendors selling special vegetables for Pitrupaksha. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : कोथिंबीर 150 रुपये प्रतिकिलो...! पितृपक्षामुळे किरकोळ विक्रीचे भाव कडाडले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : खानदेशात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितरांना खाऊ घातले जाते. यात पारंपरिक पद्धतीने आगारी टाकली जात आहे.

पुरणपोळीसह देवडांगर व विविध भाजीपाल्यांचे भोजन बनविले जात आहे. परिणामी भाजीपाल्याचे किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत.( prices of vegetables have increased in pitru paksha dhule news)

पितृपक्षाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. भोपळा अर्थात देवडांगर, काकडी, कारली, गाजर, भेंडी, गवार, चवळी, टोमॅटो, बटाटे, दोडका, हिरवी मिरची, पडवळ, फ्लवर, ढेमसे आदी भाज्यांची श्राद्धासाठी आवश्यकता असल्याने व्यापाऱ्यांनी दर वाढविले आहेत. काही भाजीपाला विक्रेत्यांनी या भाज्यांचे लहान लहान हिस्से करून साठ ते ऐंशीपर्यंतचे पॅकेजच तयार केले आहे.

दरम्यान, कोथिंबिरीचे दर कडाडले आहेत. प्रतिकिलोचे दर शंभर ते दीडशेपर्यंत भिडले आहेत. सध्या कडक ऊन पडतेय. कोथिंबीर मोठ्या प्रमाणात जळाली आहे. परिणामी दर कडाडले आहेत.

''भाजीपाल्याचे घाऊक भाव कमीच आहेत. केवळ पितृपक्षामुळे किरकोळ भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. कमी उत्पादन असूनही पाहिजे तेवढा भाव शेतकऱ्यांना मिळत नाहीये.''-देवेंद्र माळी, किरकोळ भाजीपाला विक्रेते, कापडणे

भाजीपाला व प्रतिकिलोचे दर (रुपयांमध्ये)

मिरची ३०-४०

काकडी ३०-४०

कोथिंबीर १२०-१५०

मेथी ६०-८०

पालक ५०-६०

पोकळा ५०-६०

कांदापात ७५-८०

बटाटे २०-३०

कारले ६०-८०

दोडके ५०-६०

गिलके ८०-१००

वांगी ८०-१००

भेंडी ४०-५०

चवळी १२०-१४०

गवार ६०-८०

फुलकोबी ६०-८०

टोमॅटो १५-२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT