nursery
nursery esakal
उत्तर महाराष्ट्र

Nursery Scheme : रोपवाटिकेतून विषमुक्त भाजीपाला उत्पादनाला चालना; योजनेत सहभागासाठी 'येथे' करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपेनिर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे.

त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Promotion of toxin free vegetables production from nurseries by Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Scheme nandurbar news)

कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे.

अशी होते लाभार्थ्याची निवड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी. लाभार्थी निवडताना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम, महिला गट, महिला शेतकरी द्वितीय आणि भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्यक्रम देण्यात येतो. प्रथम प्राधान्याच्या ज्येष्ठता सूचीतील संपूर्ण अर्जावर कार्यवाही झाल्यानंतरच द्वितीय प्राधान्याच्या ज्येष्ठता सूचीनुसार निवड करण्यात येते.

...तर लाभ मिळणार नाही

खासगी रोपवाटिकाधारक, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेमधून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेचा लाभास पात्र राहणार नाहीत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

असे मिळते अनुदान

टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करण्यात येते. रोपवाटिका उभारणीकरिता एक हजार चौरस मीटरच्या शेडनेट गृह, पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या ५० टक्के दोन लाख ७७ हजार ५०० रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.

योजना प्रकल्प स्वरूपात राबवायची असल्याने शेडनेट गृह, पॉलिटनेल, प्लॅस्टिक क्रेट व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर या चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक राहील, अन्यथा प्रकल्प अनुदानास पात्र असणार नाही.

उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम मोका तपासणी करून अनुज्ञेय अनुदानाच्या ६० टक्के अनुदान प्रथम हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतो. रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत द्वितीय मोका तपासणी करून उर्वरित ४० टक्के अनुदान दुसरा हप्ता लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरित करण्यात येतो.

रोपवाटिकाधारकास बियाणे कायदा १९६६ अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवान्याअभावी कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येते.

भाजीपाला रोपवाटिकेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव-दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक, जालना, कृषी महाविद्यालय, नागपूर आणि उद्यान महाविद्यालय, अकोला येथे तीन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. अर्ज करताना ७/१२ व ८ अ चे उतारे, आधारकार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाकरिता संवर्ग प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. पात्र अर्जानुसार प्रवर्गनिहाय ज्येष्ठता सूची तयार करून संबंधित शेतकऱ्यांना सोडत प्रक्रियेबाबत अवगत करण्यात येते..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT