Protest esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या; आरोपींच्या अटकेसाठी 27 ला रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीचा (चनवाईपाडा) येथे अल्पवयीन मुलगीवर अत्याचार करून तिला ठार करण्यात आले.

या प्रकरणात योग्य तपास होऊन इतर आरोपींना अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी (ता. २७) अक्कलकुवा येथे पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोर विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर रस्ता रोको करण्यात येणार आहे.

याबाबत मुलीच्या आईने पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांना निवेदन दिले. (protest on 27th for arrest of accused in akkalkuwa crime nandurbar news)

निवेदनाचा आशय असा : अत्याचाराच्या घटनेत सात संशयित असताना आतापर्यंत पोलिसांनी फक्त तीन संशयितांना अटक केली आहे. विशेष म्हणजे मृत मुलीवर १३ जुलैला अत्याचार करून गळफास लावून तिला टांगून दिले. १५ जुलैला मृत मुलीचे मामा पाण्याची मोटर घेण्यासाठी गेले असता घरात मुलीच्या नावाने आवाज दिला.

मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून दरवाजा उघडला असता घरात जाताच मुलीचा मृतदेह टांगलेला अवस्थेत दिसून आला. यासंदर्भात मोलगी पोलिस ठाण्याचे अधिकारी व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे मृत मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या वारंवार तक्रारी करूनदेखील संबंधितांनी दुर्लक्ष करून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांची भेट घेऊन घटनेची माहिती व उपलब्ध पुरावे दिले.

त्या अनुषंगाने आमदार पाडवी यांनी १९ जुलैला याबाबत विधान परिषदेत आवाज उठवून सभागृहाचे व सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे २० जुलैला मोलगी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र त्यातही खुनाचा गुन्हा दाखल न करता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

मृत मुलीच्या खूनप्रकरणी सुरवातीपासूनच या गुन्ह्यातील आरोपींना वाचविण्यासाठी व गुन्ह्याला रफादफा करण्यासाठी मोलगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, मोलगी पोलिस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी, विद्यमान अधिकारी, कर्मचारी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

उर्वरित चार आरोपींना अटक व्हावी, पोलिस अधिकारी व कर्मचारी या सर्वांची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, यासाठी २७ सप्टेंबरला अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोर आमदार पाडवी यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळेपर्यंत रास्ता रोको करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT