Protesting against cancellation of Rahul Gandhis candidacy Violent protests by Congress in Dhule news
Protesting against cancellation of Rahul Gandhis candidacy Violent protests by Congress in Dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : काँग्रेसतर्फे धुळ्यात तीव्र निदर्शने; मोदी सरकारचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मोदी सरकारने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २४) दुपारी शहरातील काँग्रेस भवनासमोर तीव्र निदर्शने केली, तसेच रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्रातील मोदी सरकारने हुकूमशाही पद्धतीने गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. (Protesting against cancellation of Rahul Gandhis candidacy Violent protests by Congress in Dhule news)

खासदार गांधी यांना दोन दिवसांपूर्वी सुरत (गुजरात) न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने हुकूमशाही तंत्राचा वापर करीत त्यांची खासदारकी रद्द केली. या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस भवनाजवळ आंदोलन झाले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्राच्या दडपशाहीविरोधात घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, राज्य सरचिटणीस युवराज करनकाळ, ज्येष्ठ रमेश श्रीखंडे, गुलाबराव कोतेकर, जिल्हा काँग्रेस सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, पंढरीनाथ पाटील, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, प्रदीप देसले, राजेंद्र भदाणे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन, बापू खैरनार, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, राजेंद्र देवरे,

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

भिवसन अहिरे, हरिभाऊ चौधरी, जावेद मल्टी, छोटूभाऊ चौधरी, अर्चना पाटील, बानूबाई शिरसाट आदींसह काँग्रेसप्रणीत विविध संघटना सहभागी झाल्या. श्री. सनेर म्हणाले, की खासदार गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. देशातील कोट्यवधी जनता काँग्रेसशी जोडली गेली. हीच भीती भाजपला सतावत असल्याने गांधी यांची खासदारकी रद्द केली. मात्र, काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही.

आमदार पाटील यांची भूमिका

आमदार कुणाल पाटील म्हणाले, की सुरत कोर्टाने एका अब्रुनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. त्यांच्या यशस्वी भारत जोडो यात्रेमुळे देशभरात त्यांची प्रतिमा उंचावली, विविध घटक जुळले गेले, याच गोष्टीचा भाजपने धसका घेतला, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सुरत सत्र न्यायालयाच्या निकालानंतर अपील करणार असल्याचे खासदार गांधी यांनी सांगितले आहे. तरीही मोदी सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. त्याचा निषेध करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT