water supply scheme
water supply scheme esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘एमजेपी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘दांडी’ने प्रश्‍न कायम! अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अखेर एमजेपीच्या अधिकाऱ्यांना महापालिकेत बोलावले खरे पण, कनिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला पाठविल्याने या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही.

एमजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवा तरच योजनेचे उर्वरित काम लवकर मार्गी लागेल, असा सूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लावला. त्याअनुषंगाने एमजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याबाबतही पर्याय पुढे आला.

त्यामुळे ही योजना कधी पूर्ण होईल याबाबत स्थिती अद्यापही प्रश्‍नांच्या भोवऱ्यात दिसते. विशेष म्हणजे खुद्द आयुक्तांनी आपले मॉनिटरिंग व्यवस्थित नसल्याचे एमजेपीच्या अभियंत्यांना सांगितले. (question remains with Dandi of senior officers of MJP Akkalpada Water Supply Scheme Dhule News)

-

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर १६९ कोटी रुपये खर्चाच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के झाले, ९५ टक्के झाले. लवकरच योजनेचे टेस्टिंग सुरू होईल, योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होईल, असे दावे अधिकाऱ्यांकडून होत आहेत.

प्रत्यक्षात हे दावे फोल ठरत असल्याने महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांच्या मनातही प्रश्‍न आहेत. या पार्श्वभूमीवर योजनेची जबाबदारी असलेल्या एमजेपीच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार १३ एप्रिलला स्थायी समितीच्या सभेनंतर सभापती किरण कुलेवार, आयुक्त देवीदास टेकाळे यांनी योजनेचा आढावा घेतला. या बैठकीला एमजेपीचे दोन अभियंते उपस्थित होते. यातील एका अभियंत्याने योजनेविषयी माहिती दिली.

मात्र, तांत्रिक माहिती असल्याने अभियंत्याशिवाय कुणाच्याच पदरी काही पडल्याचे दिसले नाही. अमुक काम ९० टक्के झाले, उर्वरित काम आठ दिवसांत होईल, तमुक काम ९५ टक्के झाले, उर्वरित काम चार दिवासांत होईल, हे काम एवढे झाले, ते काम तेवढे झाले.

ते काम शेवटच्या स्टेजला आहे. बाकीची कामे चार दिवस, आठ दिवस, पंधरा दिवसांत पूर्ण होईल अशी उत्तरे देण्यात आली. योजनेचे ओव्हरऑल काम ९५ टक्के झाल्याचा दावाही एमजेपीच्या अभियंत्यांकडून झाला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

प्रत्येकाच्या मनात शंका

एमजेपीच्या अभियंत्यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह उपस्थित नगरसेवकांच्या मनात प्रश्‍न उभे राहिल्याचे दिसले. आयुक्त देवीदास टेकाळे यांनी आपण चार्जेस घेणार आहात पण तुमचे योजनेवरील मॉनिटरिंग व्यवस्थित नाही, असे एमजेपीच्या अभियंत्यांना बोलून दाखविले.

नगरसेवक हर्ष रेलन यांनी योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी नगरसेवकांची समिती नेमा, असा पर्याय सुचविला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा

दरम्यान, योजनेची एकूणच स्थिती व उर्वरित कामे लवकर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने एमजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवा, अशी सूचना महापालिकेचे अभियंते कैलास शिंदे यांनी केली.

त्यांच्या या सूचनेवरून आयुक्त टेकाळे यांनी तूर्त एमजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ऑनलाइन बैठक आयोजित करा, अशी सूचना केली. एकूणच अक्कलपाडा योजनेच्या सद्यःस्थितीबाबत अद्यापही अनेक प्रश्‍न आहेत. त्यामुळे यावर गांभीर्याने चर्चा, निर्णय घेणे आवश्‍यक आहे.----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT